चिमूर,चंद्रपूर

गावाच्या आदर्शातुन प्रगत देशाची कल्पना प्रगट होणार : ह.भ.प. विलासराव साबळे महाराज

गावाच्या आदर्शातुन प्रगत देशाची कल्पना प्रगट होणार : ह.भ.प. विलासराव साबळे महाराज
चिमुरात वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव संपन्न

चिमूर/प्रतिनिधी :-ज्ञानेश्वर जुमनाके
वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मानवी वर्तनाला फार महत्व दिले आहे. गावाचा विकास शोधण्यासाठी मानवी वर्तन महत्त्वाचे आहे. गावातील प्रत्येक माणुस सदाचारी असला पाहिजे. चारित्र्यवान असला पाहिजे तरच गावाचा विकास साधता येतो. गावाच्या आदर्शातुन प्रगत देशाची कल्पना प्रगट होणार असे प्रतिपादन गुरुकुंज आश्रम मोझरीचे आजीवन प्रचारक ह.भ.प. विलासराव साबळे महाराज यांनी व्यक्त केले.
ते श्री गुरुदेव सेवा गुरुदेव वार्ड चिमुर येथे आयोजित वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवात गोपालकाल्यानिमित्य बोलत होते.
याप्रसंगी गुरुकुंज आश्रम मोझरीचे जीवन प्रचारक राजू देवतळे, ग्रामगीताचार्य प्रा. राम राऊत, चंद्रपूर जिल्हा प्रचार प्रमुख प्रा. अशोक चरडे, बाळासाहेब पडवे, चंदू नंदनवार, उईके महाराज, कापसे महाराज आदींनी पुण्यतिथी महोत्सवात मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच चिमुर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार भांगडीया महोत्सवाप्रसंगी सायंकाळी भेट देऊन गुरुदेवभक्तांशी संवाद साधला व गुरुदेवाच्या कार्यास आपले सहकार्य राहील असे आश्वासन दिले.
या महोत्सवा दरम्यान सामुदायिक ध्यान, ग्रामगीता वाचन, चिंतन, प्रबोधन, बालगोपालांची भजन स्पर्धा, गीतगायन स्पर्धा, हळदीकुंकू कार्यक्रम, महिला संमेलन, रामधून, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन परमानंद बोरकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार ग्रामसेवाधिकारी वसंत कडू गुरुजी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता देविदास मेश्राम, प्रकाश बोकारे, भक्तदास जिवतोडे, अरडे, अश्विनी रोकडे, प्रज्ञा कामडी, शोभा नवले, शिला राचलवार, संगीता कुबडे, ममता बिरजे, हर्षा शिंदे, मंदा कुंटेवार, नलिनी तालेवार, संगीता देवतळे, सविता शास्त्रकार, कविता नन्नावरे, उर्मिला चरडे, नंदा देवतळे, आशा तालेवार, ज्योती भट, भावना भट, सोनू भट, उषा कापसे, मंजुषा गराटे, सपना जांभुळे, रुपाली राचलवार, संगीता कुबडे, अर्चना राचलवार, वैशाली अल्लडवार, केशव मसराम, रोहित गोयानी, शिवराम मेश्राम, मंजुल शेख, मारोतराव अतकरे, दिलीप राचलवर, राजेंद्र कापसे, राजू भट, सूर, मधु भैसाणे, गिरीष कुंभारे, कमलसिंग अंधरेले, डॉ. अनिल भार्गव, कृष्णा तपासे, भोयर, सचिन वैद्य, विठ्ठल सावरकर आदिने अथक परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button