Amalner

हिंगोणे बु येथे गावठी हातभट्टी उद्धवस्त..!मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!

हिंगोणे बु येथे गावठी हातभट्टी उद्धवस्त..!मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!

अमळनेर तालुक्यातील हिंगोणे बुद्रुक येथे मारवड पोलिसांनी १३ रोजी दुपारी साडेतीन वाजता छापा टाकून गावठी दारूची हातभट्टी उध्वस्त केली.

सहाय्यक पोलिस निरीक्षक जयेश खलाने, उपनिरीक्षक वैभव पेठकर, हेडकॉन्स्टेबल सुनील तेली हेडकॉन्स्टेबल फिरोज बागवान, नेहा बारेला यांनी वसंत काशीनाथ भिल यांच्या घराच्या आडोश्याला छापा टाकला असता. त्या ठिकाणी त्यांना गावठी दारूची हातभट्टी सुरू असलेली दिसून आली.यावेळी उपलब्ध ठिकाणीसर्व प्लास्टिकचे ड्रम तोडत हातभट्टी उध्वस्त करण्यात आली. तसेच १५ हजार रुपयांचे ३० लिटर नवसागर, गुळ मिश्रित रसायन जप्त केले आहे. आरोपी वसंत भिल फरार असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button