Pune

व्याहळी गावाचे सुपुत्र ,शिक्षक विजय पवार यांनी निमगांव केतकी कोविड सेंटरला दहा ऑक्सिजन सिलेंडरची दिली भेट

व्याहळी गावाचे सुपुत्र ,शिक्षक विजय पवार यांनी निमगांव केतकी कोविड सेंटरला दहा ऑक्सिजन सिलेंडरची दिली भेट
दत्ता पारेकर पुणे
पुणे : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभुषन डाॅ . कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी औचित्य साधून गरजु रुग्नांकरीता रयत शिक्षण संस्थेचे सौ.कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व ज्युनिअर कॉलेज इंदापुर कलाशिक्षक विजय विठ्ठलराव पवार सर यांनी स्वखर्चाने इंदापूर तालुक्यातील निमगांव केतकी येथील शासकीय रुग्णालय कोविड सेंटरला(दि.९) रोजी १० ऑक्सिजन सिलेंडर मदत म्हणून , कर्तव्य म्हणून समाजाचे काहीतरी आपण देणं लागतो म्हणून छोटीशी मदत केली आहे.
इंदापूर तालुक्यातील आमचे तालुका प्रतिनिधी कैलास पवार यांच्याशी बोलताना विजय पवार सर म्हणाले की , जगामध्ये कोरोनाव्हायरस या आजाराने थैमान घातले असताना इंदापूर तालुक्यात सुद्धा बिकट परिस्थिती असून कोरोना रुग्णांना अनेक सुविधांची कमतरता भासत आहे . यासाठी इंदापूर तालुक्यातील दानशूर व्यक्तीने पुढे येऊन संकट काळात मदतीसाठी पुढे आले पाहिजेल.
मी माझ्या स्वखर्चातून ऑक्सीजन सिलेंडर डाँ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त मदत म्हणून केली आहे आणि इंदापूर तालुक्यामध्ये ५०० ऑक्सिजन सिलिंडर देण्याचा मानस आहे. स्वतः पुढे येवुन कोरोना व्हायरसच्या विरोधात एकमेकांना सहकार्य करण्याची गरज आहे. होईल तेवढी मदत गरजु रुग्नांकरीता करावी अशे विजय पवार सर यांनी आपली भावना व्यक्त केली.
इंदापूरचे तहसीलदार अनिल ठोंबरे यांनी मोलाचे सहकार्य केले असुन इंदापूर तालुक्यातील व्याहळी गावचे सुपुत्र ,शिक्षक विजय पवार सर, निमगांव केतकी सजा येथील सर्कल राखुंडे भाऊसाहेब आणि निमगांव केतकी शासकीय रुग्णालय कोविड सेंटरमधील डॉक्टर, नर्स ,कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button