Taloda

वाल्हेरी ते एकधड गावांना जोडणारा पुलांचे काम करण्याची मागणी – एकलव्य आदिवासी युवा संघटना

वाल्हेरी ते एकधड गावांना जोडणारा पुलांचे काम करण्याची मागणी – एकलव्य आदिवासी युवा संघटना

तळोदा / प्रतिनिधी – गणपत पाडवी

तळोदा तालुक्यातील वाल्हेरी ते एकधड गावा दरम्यान असलेल्या देववाल्हेरी नदीवर पुलाचे बांधकाम दहा वर्षापासून अर्धवट राहिले आहे त्यामुळे वाहनधारकांसह विद्यार्थी व शेतकर्‍यांना त्रास सहन करावा लागत आहे प्रशासनामार्फत पुलाच्या कामासाठी उपयोजना करण्यात यावी अशी मागणी एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने तळोदा तहसिलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली .

वाल्हेरी परिसरातील अनेक गावांना जोडण्यासाठी देववाल्हेरी नदीवर पूल मंजूर झाला त्याचे बांधकाम देखील हाती घेण्यात आले परंतु संबंधितमार्फत या पुलाचे बांधकाम अर्धवट सोडण्यात आले आहे अपूर्ण अवस्थेत असलेल्या वाहनधारकांना ये-जा करतांना परिसरातील विद्यार्थ्यांनाही तारेवरची कसरत करावी लागत आहे वाल्हेरीवरून अनेक विद्यार्थ्यांनाही शिक्षणासाठी ये-जा करीत असतात परंतु दळणवळणयासाठी योग्य सुविधा नसल्याने त्यांना शाळेत जाण्यासाठी विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे वाहतुकीची सुविधा होत नसल्याने जाण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांच्या नाकीनऊ येत असल्याचे पालकांकडून सांगण्यात येत आहे. शासनाकडून शिक्षणासाठी विविध योजना राबविल्या जात दुसरीकडे साध्या दळणवळणाच्या सुविधाही मिळत नसल्याने पालकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे नदीपात्रातील मोठ मोठ्या दगडांमधून मार्ग काढत वाहनधारकांना वाहन न्यावे लागत आहे. तर चारचाकी वाहनांची देखील अशाच काहीशा परिस्थितीत मार्ग काढत आहे. परिसरातील ग्रामस्थांना पावसाळ्यात याचा त्रास सहन करावा लागतो पावसाच्या पाण्यामुळे परिसरात संपूर्ण चिखल पसरतअसल्याने त्यातून वाट काढणे अवघड होते.

आरोग्याच्या सुविधासाठी याठिकाणी पूल बांधणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु या ठिकाणी पुलच नसल्याने रुग्णांना काही किलोमीटरचा फेरा मारून दवाखान्यात न्यावे लागते. यातही रुग्णांचा पालकांसमोर अनेक अडचणी निर्माण होतात केवळ पुलाचे बांधकाम अपूर्ण राहिल्यामुळे आरोग्यावरही परिणाम दिसून येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे या अपुर्ण पुलावरून प्रवास करतांना अनेक वेळी छोटे-मोठे अपघात झाले आहे 2015 मध्ये आलेल्या महापुरात वाल्हेरी येथील अमरासिगं वसावे यांना आपला प्राणदेखील गमवावा लागला होता अशा घटना टाळण्यासाठी पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी नागरिकांकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे परंतु प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे यावर मात करण्यासाठी पुलाचे काम तातडीने हाती घेत पूर्ण करण्यात यावे अशी संघटनेचा वतीने मागणी करीत आहे असे निवेदनात म्हटले आहे.

त्यावेळी तळोदा व अक्कलकुवा संघटनेचे अध्यक्ष गणपत पाडवी, दिनेश वळवी ,राकेश पाडवी ,दिपक पाटील, रघु पाडवी मुकेश पाडवी, इत्यादी उपस्थित होते

Leave a Reply

Back to top button