Maharashtra

अमळनेर नगरपरिषद हद्दीतील १५ पाचपावली चौक ते वाडी चौक पर्यंतच्या रस्त्याचे लोकार्पण

अमळनेर नगरपरिषद हद्दीतील राज्यमार्ग १५ पाचपावली चौक ते वाडी चौका पर्यंतच्या रस्त्याचे लोकार्पण

रस्त्याची दुर्दशा झालेली होती परीसरातील जनतेच्या प्रलंबित मागणीची पूर्तता

प्रतिनिधी नूरखान

मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील व लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.पुष्पलता पाटील यांनी नगरपालिकेमार्फत सदर रस्ता रुंदिकरण, दुभाजक,गटारीसह,काँक्रीटीकरण व विद्युतीकरणाचे काम टप्पा १ नुसार राज्यमार्ग १५ ते डाॅ.वैद्य यांचे हाॅस्पिटलपर्यंतचे काम पुर्णत्वास आल्यामुळे रस्त्याचे व पथदिव्यांचे लोकार्पण करुन मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील,पोलीस निरीक्षक,श्री.अंबादास मोरे,नगरपरिषद गटनेते श्री.प्रविण पाठक यांच्या शुभहस्ते पुजन करण्यात आले.तद्नंतर परीसरातील व्यावसायिक व नागरीकांनी सदर विकासकामाबाबत समाधान व्यक्त करत मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करतांना नगरसेवक बाळासाहेब संदानशिव,धनु महाजन, पंकज चौधरी,विक्रांत पाटील, प्रशासन अधिकारी, श्री.संजय चौधरी,अभियंता श्री.संजय पाटील,आरोग्य निरीक्षक श्री.युवराज चव्हाण,जितेंद्र कटारीया,बाळू माने, दिपक मद्रासी, तसेच परीसरातील व्यापारी नागरीक उपस्थित होते..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button