Amalner

कोविड-19 ची तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरण आवश्यक..नगराध्यक्षा पुष्पलता पाटील

कोविड-19 ची तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरण आवश्यक..नगराध्यक्षा पुष्पलता पाटील

अमळनेर नगरपरिषद क्षेत्रातील कोविड-19 चा काल दिनांक 12 ऑक्टोबर,2021 पर्यंत एकूण पहिला डोस घेतलेल्या लाभाथींची संख्या
41,591 व आजपर्यंत एकूण दुसरा डोस घेतलेल्या लाभार्थीची संख्या 17,059
असे एकूण आज अखेर एकुण डोस घेतलेल्या लाभाथींची संख्या 58,650 एवढी
अल्पश्या प्रमाणात लसीकरण झालेले आहे.
कोविड-19 विषाणूंच्या प्रादुर्भावास प्रतिबंध करण्यासाठी शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन आदेशान्वये विविध बाबींवर कामांवर आणलेले निबंध आता पुनर्विचाराअंती शिथील करण्यात आलेले आहेत. सद्य:स्थितीत सणासुदीचे दिवस असल्याने बाजारात होणारी गर्दी, तिस-या लाटेची शक्यता याकरीता कोविड-19ची तिसरी लाट आटोक्यात आणण्यासाठी नागरीकांनी 18 वयोगटावरील सर्व नागरीकांनी लसीकरण करणे आवश्यक आहे. अमळनेर नगरपरिषद क्षेत्रातील आरोग्य विभागाकडे आवश्यक लसीकरणाचे डोस उपलब्ध असून सदर लसीकरण नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व नगरपरिषदे मार्फत प्रभाग निहाय टप्प्या-टप्प्याने सुरु आहे. सदर लसीकरण यशस्वी होण्यासाठी नगरपरिषदेचे मा सभापती, मा नगरसेवक
(नगरसेविका, मा मुख्याधिकारी,वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, नगरपरिषद सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी यांचे कडून अथक प्रयत्न केले जात असूनही नागरीकांकडून पाहीजे तसा प्रतिसाद मिळत नाही. तरी कोविड-19 प्रादुर्भावास प्रतिबंध करणेसाठी जास्तीत जास्त नागरीकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ पुष्पलता पाटील यांनी केले
आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button