Pandharpur

लसीचा पहिला डोस, दुसरा डोस व वया नुसार लसीकरण केंद्र स्वतंत्र असावेत:- नगरसेवक विवेक परदेशी

लसीचा पहिला डोस, दुसरा डोस व वया नुसार लसीकरण केंद्र स्वतंत्र असावेत:- नगरसेवक विवेक परदेशी
रफिक आतार पंढरपूर
पंढरपूर : कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण महत्वाचे आहे हे सिद्ध झालेले आहे. नागरिकांच्या मनात लसी विषयी विश्वास निर्माण झाला आहे. आता नागरिक लसीकरणाला नंबर लावण्यासाठी खुप प्रयत्न करत आहेत. काही नागरिकांचा लसीचा प्रथम डोस पुर्ण झाला आहे व ते दुसऱ्या डोस कधी मिळेळ या प्रतिक्षेत आहेत. काही नागरिकांचा पहिलाच डोस राहीला आहे. लसीच्या उपलब्धते नुसार लसीकरणाचे सेंटर स्वतंत्र करण्यात यावे अशी विनंती करण्यात आली. ज्याचा पहिला डोस आहे, ज्याचा दुसरा डोस आहे आणि १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरणासाठी स्वतंत्र सेंटर करण्याची विनंती करण्यात आली. शासनाच्या वतीने आलेल्या सुचनेनुसार ज्या नागरिकांची लसीकरणाची दुसऱ्या डोसची तारीख जवळ आली आहे त्यांना प्राधान्य देण्यात यावे. दोन डोस मधील नेमके अंतर किती, दुसरा डोस घेण्यास उशीर झाल्यास आपला पहिला डोस वाया तर जाणार नाही ना? असे नागरिक प्रश्न विचारत आहे. लसीच्या दोन डोसच्या मध्ये नेमके किती दिवसाचा कालावधी असतो किंवा चालतो या बाबत अधिकृत माहीती आपण जनजागृती च्या माध्यमातून द्यावी अशी विनंती नगरसेवक विवेक परदेशी यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ एकनाथ बोधले, प्रांत अधिकारी सचीनजी ढोले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर साहेब यांचे कडे केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button