Arondol

बाल साहित्यातील बालकवी पुस्कार एरंडोल येथील कवी अँड . विलास कांतीलाल मोरे यांच्या ” शाळेला सुट्टी लागली रे ” या कविता संग्रहाला  जाहिर करण्यात आला

बाल साहित्यातील बालकवी पुस्कार एरंडोल येथील कवी अँड . विलास कांतीलाल मोरे यांच्या ” शाळेला सुट्टी लागली रे ” या कविता संग्रहाला जाहिर करण्यात आला

एरंडोल : दिनांक २८ जानेवारी स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार-2019 जाहीर करण्यात आले . बाल साहित्यातील बालकवी पुस्कार एरंडोल येथील कवी अँड . विलास कांतीलाल मोरे यांच्या ” शाळेला सुट्टी लागली रे ” या कविता संग्रहाला जाहिर करण्यात आला . पुरस्काराचे स्वरूप र .रु ५०००० / ( पन्नास हजार मात्र ) व सन्मानचिन्ह असे आहे . दिलीपराज प्रकाशन, पुणे यांनी हा कविता संग्रह प्रकाशित केलेला आहे .
मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी
मराठी भाषेतील साहित्य निर्मीतीतील योगदानाबद्दल पुरस्कार प्राप्त सर्व विजेत्यांचे अभिनंदन करित असतांनानाच या साहित्यिकांकडून मराठी भाषा संवर्धन व वृद्धी यासाठी मराठी भाषा विभागाला मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
अँड विलास मोरे यांचे संगणकाची गाणी, अतड्म ततड्म हे बाल कविता संग्रह प्रसिद्ध असुन ललकारी हा ग्रामिण कथांचा कथासंग्रह व चैत्रपालवी हा कविता संग्रह प्रसिद्ध आहे . संगणकाची गाणी या कविता संग्रहास या पूर्वी सुर्योदय साहित्य मंडळाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे .
अँड . विलास मोरे यांचे औदुंबर साहित्य रसिक मंचचे अध्यक्ष अँड .मोहन शुक्ला , प्रा . वा . ना . आंधळे, विजय महाजन, शालिकभाऊ गायकवाड, पी .जी . चौधरी सर, निंबा बडगुजर , तसेच साहित्य क्षेत्रातील मान्यवरांकडून
अँड . विलास मोरे यांचे अभिनंदन होत आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button