Pandharpur

आपटे प्रशालेत लसीकरण शिबिराचे आयोजन संपन्न

आपटे प्रशालेत लसीकरण शिबिराचे आयोजन संपन्न

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर शहरातील प्रभाग क्रमांक 5 मधील नागरिकांना कोरोनाची मोफत लस देणेकामी आपटे उपलप प्रशालेत लसिकरण शिबिराचे आयोजन या प्रभागाचे नगरसेवक अनिल अभंगराव व सुप्रिया डांगे यांनी केले होते.या लसीकरण केंद्राचे कार्यक्रमाचे उदघाटन आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या शुभहस्ते स्व.माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. कार्यक्रमास माजी नगरसेवक हरिभाऊ डांगे माजी उपनगराध्यक्ष नागेशकाका भोसले माजी नगराध्यक्ष लक्ष्मणभाऊ शिरसट, प्रभाग क्र 5 चे नगरसेवक अनिल अभंगराव, श्रीमती सुप्रियाताई डांगे, आरोग्य समिती सभापती विक्रम शिरसट, मुख्याधिकारी अरविंद माळी, उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर, अर्बन बँकेचे संचालक हरिष ताठे, आपटे उपलप प्रशालेचे सचिव बी.जे.डांगे, मुख्याध्यापक जयंत हरिदास, राजगोपाळ भट्टड,श्रीकांत हरिदास, दिलीप शहा, सतिश सुपेकर तसेच आपटे उपलप प्रशालेचे शिक्षक वर्ग व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button