Nandurbar

हरणखुरी गावांत लसीकरण शिबिर यशस्वी दोनशे पेक्षा जास्त नागरिकांचे झाले लसीकरण

हरणखुरी गावांत लसीकरण शिबिर यशस्वी दोनशे पेक्षा जास्त नागरिकांचे झाले लसीकरण

धडगांव: हरणखुरी गावांत पाटीलपाडा येथे आज लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आहे. आदिवासी जनजागृती टीमचा (उलगूलान फाऊंडेशन) पुढाकार व आरोग्य विभागाचे सहकार्य मिळून 216 लोकांचे लसीकरण करून शिबिर यशस्वी झाले. लसीकरणासाठी हरणखुरी,भुजगांव सूरवाणी व जमानवाई या गावातील नागरिकांनी सहभाग घेत लसीकरण करून घेतले. दिवसभर जोरदार पाऊस सुरू असुन देखील लोकांच्या उत्साह कमी झाला नाही. लसीकरण शिबिरात आदिवासी जनजागृती टीमने मास्क, चहा बिस्कीट व साबण वाटप केले लोकांना मदतीसाठी हेल्प डेस्क लावले. तसेच ‘ लसीकरण रथ ‘ चालवून लसीकरण केंद्रापर्यंत येण्या-जाण्याची सोय केली. शिबिराच्या निमित्ताने उपस्थित नागरिकांना आदिवासी जनजागृतीने तयार केलेले *स्थानिक भाषेतील शॉर्ट फिल्म व अवेअरनेसचे शॉर्ट विडिओ दाखविण्यात आले* प्रसंगी तालुका आरोग्याची अधिकारी डॉ. दिनेश वळवी, डॉ. मालती ठाकरे वैद्यकीय अधिकारी (प्रा. आ. केंद्र, खुंटामोडी) MPW देवराम वळवी, परिचारिका श्रीमती पी. टी. तोरडे , श्री गोकुळ गंगातेरे, आर. बी. सोनवणे, आर. के. सोनार जि. प. शाळेचे शिक्षक भंडारी सर आशाताई अंगणवाडी सह पूर्ण आरोग्य विभागाची टीम उपस्थित होती. शिबिर यशस्वीतेसाठी आदिवासी जनजागृती टीमने (उलगूलान फाऊंडेशन) परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button