Amalner

धनदाई महाविद्यालयात लसीकरण व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

धनदाई महाविद्यालयात लसीकरण व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

अमळनेर: येथील धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयाच्या एन. एस. एस. विभागातर्फे मिशन युवा स्वास्थ्य 2021 अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी मोफत लसीकरण शिबिर संपन्न झाले. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद पवार अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून तुळजाई क्लिनिकचे डॉ. हेमंत कदम, डॉ. प्राजक्ता कदम, राजात्मा क्लिनिकच्या डॉ. हर्षाली चव्हाण, एन एस एस चे जिल्हा समन्वयक डॉ मनीष करंजे, सरकारी रुग्णालयाचे प्रसाद शिरसागर, मंगला परदेशी, साधना पाटील, वंदना कापडणे, भारती पाटील, धनदाई माता एज्युकेशन सोसायटीचे सचिव राधेश्याम पाटील संचालक नंदकुमार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

लसीकरणापूर्वी प्रवेशित विद्यार्थ्यांची विद्यार्थी विकास विभागातर्फे आरोग्य तपासणी करण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांचा कोरोना लसीकरणाचा पहिला किंवा दुसरा डोस बाकी असेल त्या विद्यार्थ्यांना लसीकरण शिबिरात लस देण्यात आली. कोविड लॉकडाऊनच्या कालखंडानंतर महाविद्यालय तथा परीक्षा ऑफलाइन होण्याची शक्यता असल्याने सर्व विद्यार्थ्यांनी लसीकरण करून घ्यावे असे आव्हान प्राचार्य प्रमोद पवार यांनी केले. लसीकरण शिबिर यशस्वी व्हावे म्हणून एन.एस.एस. कार्यक्रमाधिकारी डॉ. राहुल इंगळे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, प्रा. प्रवीण पवार, महिला कार्यक्रमाधिकारी मीनाक्षी इंगोले उपप्राचार्य किशोर पाटील यांच्यासह विशेष प्रयत्न केले तर आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन विद्यार्थी विकास विभागामार्फत डॉ. भगवान भालेराव यांनी केले. या शिबिराच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button