Pandharpur

पंढरीतील लसीकरण केंद्रात नागरिकांचा राडा केंद्रप्रमुख गैरहजर ; पोलीस पण हतबल सोशल डिस्टंसिंगचा फज्जा

पंढरीतील लसीकरण केंद्रात नागरिकांचा राडा
केंद्रप्रमुख गैरहजर ; पोलीस पण हतबल सोशल डिस्टंसिंगचा फज्जा


रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : सध्या राज्यात लसीकरणासाठी पुरेशी लस उपलब्ध नसल्याने लशीचा तुटवडा जाणवत असताना नागरिकांनी लसीकरणासाठी एकच गर्दी केल्यामुळे पंढरपूर येथील लसीकरण केंद्र क्रमांक दोन येथे प्रचंड गर्दी झाली होती. यातच लसीकरण केंद्रप्रमुख गायब असल्याने महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी, पोलीस प्रशासन व नगराध्यक्षा यांना परिस्थिती हाताळावी लागली. मात्र यावेळी सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाल्यामुळे या लसीकरणाचा कितपत फायदा होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.सध्या महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत असताना पोटनिवडणूकीमुळे पंढरपूर मंगळवेढा भागात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पंढरपूर येथील नगरपालिका प्रशासनाच्या दवाखाना क्र. २ येथे लसीकरण केंद्र निर्माण करण्यात आले आहे. मात्र लस घेण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केल्यामुळे या ठिकाणी नागरिकांनी एकच गर्दी करतं प्रचंड रेटारेटी केल्यामुळे परिस्थिती प्रशासनाच्या हाताबाहेर गेल्याचे दिसून आले.गेल्या काही आठवड्यात लसीकरण करण्यासाठी नागरिक फिरकतही नव्हते. मात्र कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी लसीकरणासाठी एकच गर्दी केली होती. या वेळी लसीकरण केंद्रप्रमुख यांनी दांडी मारल्यामुळे लसीकरण केंद्रातील परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे दिसून आले. पोलीस प्रशासन, होमगार्ड व नगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी हजर राहून नागरीकांना समजावण्याचे प्रयत्न केले. तर दुसरीकडे पोलीस कर्मचारी ओळखीच्या नागरिकांना टोकन देण्याचे काम करण्यात व्यस्त होते. यातून पंढरीतील लसीकरण केंद्रावर सकाळपासून एकच गोंधळ उडाला होता. यामुळे लसीकरण केंद्रावर रोज लस देण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे दिसत आहे. आता आरोग्य प्रशासन लसीकरण केंद्रावर गैरहजर राहणाऱ्या केंद्रप्रमुखांवर काय कारवाई करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button