Khirdi

उत्कर्ष नेमाडे चे दुसऱ्यादा गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद

उत्कर्ष नेमाडे चे दुसऱ्यादा गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद

प्रविण शेलोडे खिर्डी

खिर्डी : दि. 13 तालुक्यातील खिर्डी बु येथील उत्कर्ष किरण नेमाडे या ग्रामिण भागातील तरुणाने लॉक डाउन चा सदुपयोग करून सर्वात तरुण संगीतकार म्हणून गिनिज बूक ऑफ रेकॉर्ड मध्ये लंडनचे रेकॉर्ड तोडले होते. त्या यशानंतर आता दुसऱ्यांदा भारतीय कॉर्डिनेटर व दिल्ली येथील मुख्य लेखक हेमंत बन्सल यांनी त्याला सहभागी होण्याची संधी दिल्याने आपल्या आवडीतून एक लेख ,दोन कविता एक मराठी आणि एक इंग्रजी या भाषेतून जगातील होत असलेल्या लेखन स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. उत्कर्षच्या या लिखाणाला जगातील उत्कृष्ट असे सहा नामांकन पुन्हा मिळालेले आहे.स्वतःचा छंद म्हणून उत्कर्ष ने तो जोपासला आणि विश्वविक्रम झाल्याचे समजल्यावर कुटुंबास कळविले उत्कर्षने राज्यात नव्हे देशात नव्हे तर जगातच नाव उंचवले आहे.त्या बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. *या रेकॉर्ड मध्ये झालेली नोंद* 1) गिनीज बूक ऑफ रेकॉर्ड 2)ब्रावो इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड 3)एक्सकलुसिव्ह इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड 4)रॉयल सक्सेस बूक ऑफ रेकॉर्ड 5)इंटरनॅशनल टॅलेंट बुक ऑफ रेकोर्ड 6)इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button