India

अनुसूचित जाती बद्दल अपशब्द  वापरला..!क्रिकेटपटू युवराज सिंगला अटक आणि अटकपूर्व जामीन..!

अनुसूचित जाती बद्दल अपशब्द वापरला..!क्रिकेटपटू युवराज सिंगला अटक आणि अटकपूर्व जामीन..!

हरियाणा भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगला अटक करण्यात आली असून अटकपूर्व जामिनावर सुटका करण्यात आली आहे. हरियाणाच्या हांसी येथील हिसार पोलिसांनी युवराजला अटक केली. अनुसूचित जातीविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी युवराजवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या वर्षी रोहित शर्मासोबत लाइव्ह चॅटमध्ये यजुर्वेंद्र चहलवर अनुसूचित जातीबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप युवराजवर करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर युवराज चंदीगडला पोहोचला. तिथे त्याला हिसार पोलिसांनी त्याला अटक केली.
अटकेनंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्याची औपचारिक जामिनावर सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणात काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने युवराजला अटकपूर्व जामिनाचे आदेश दिले होते. यामुळे, हांसी पोलिसांनी त्याला औपचारिकरित्या अटक केली त्याच्याकडून काही प्रश्नांची उत्तरे जाणून घेतली आणि नंतर त्याला अटकपूर्व जामीन पत्रांच्या आधारे सोडण्यात आले.सामाजिक कार्यकर्ते रजत कलसन यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती.युवराजने सोशल मीडियावर चूक मान्य करत माफी मागितली होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button