मोठा वाघोदा

मोठा वाघोदा येथील उर्दु शाळे शेजारील जल कुंभ देतोय आजारांना आमंत्रण

मोठा वाघोदा येथील उर्दु शाळे शेजारील जल कुंभ देतोय आजारांना आमंत्रण

प्रतिनिधी मुबारक तडवी

मोठा वाघोदा तालुका रावेर /-येथील निंभोरा रोड मधील असलेल्या जलस्वराज्य योजनेतून 35 लाख रुपये खर्च होऊन निर्माण झालेल्या पाणी टाकी शेजारील रहिवाशांचे घरांचे गटारीचे सांडपाणी पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईन व्हॉल्व मध्ये मुर तोय हे गटारीचे घाण पाणी एखाद्या पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप मध्ये मिश्र झाल्यास ३ वर्षा पूर्वी डायरीयाची शेकडो नागरिकांना लागण झाली होती बाधितांना रावेर ग्रामीण रुग्णालायामध्ये रुग्णांची जणू यात्राच भरली होती त्याची पुनरावृत्ती होण्याची मोठा वाघोदा ग्रामपंचायत वाट पाहतेय का ? गावात साथीच्या आजारांचे रुग्णांत झपाट्याने वाढ होताना दिसतेय गटारी तुडुंब भरल्या आहेत डासांचा उपद्रव जोमाने वाढला असून अद्याप कीटक नाशक फवारणी करण्यात आली नसून ग्राम पंचायत गावात साथीचे आजार होण्याची वाट पाहतेय का*? वारंवार ग्रामपंचायतीकडे तक्रार करूनही या प्रश्नाकडे मुद्दाम दुर्लक्ष का केले जात आहे? तरी संबंधित वरिष्ठांनी याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावे अशी मागणी मोठा वासियांतून होत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button