रावेर

खिरोदा प्र रावेर येथील सरपंचपदी सौ अरुणाबाई प्रशांत पाटील यांची बिनविरोध निवड

खिरोदा प्र रावेर येथील सरपंचपदी सौ अरुणाबाई प्रशांत पाटील यांची बिनविरोध निवड

विलास ताठे

रावेर (प्रतिनिधी) :- खिरोदा प्र रावेर येथील सरपंचपदी सौ अरुणाबाई प्रशांत पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे
येथील सरपंच पार्वताबाई महाजन यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर आज निवडणूक घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन पाटील यांनी एकमेव उमेदवारी अर्ज आलेल्या अरुणाबाई पाटील यांची बिनविरोध निवडीची घोषणा केली.

या विशेष बैठकीला उपसरपंच सौ गुलशान तडवी,ग्राम पंचायत सदस्य सुनिल महाजन, इब्राहीम तडवी सौ संगीता महाजन,पार्वताबाई महाजन, आत्माराम पाटील,अतुल महाजन,शालुबाई सोनवणे उपस्थित होते. खरेदी विक्री संघ चेअरमन पि.आर. पाटील,मराठा समाज विकास मंडळाचे सचिव वामनराव पाटील,सिताराम महाजन, विजय पाटील, सुरेश पाटील, सुभाष पाटील, रुबाब तडवी,वसंत पाटील, सतीष पाटील नितिन पाटील, निवृत्ती पाटील,ग्राम सेवक भालेराव आदीनी अभीनंदन केले नविन सरपंच सौ पाटील या मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या पत्नी आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button