Faijpur

स्वर्गीय नानासाहेब देविदास फालक यांना वाहिली अनोखी आदरांजली

स्वर्गीय नानासाहेब देविदास फालक यांना वाहिली अनोखी आदरांजली

सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपूर तालुका यावल

भुसावळ कला विज्ञान आणि पू.ओं. नाहाटा महाविद्यालयात ‘ *कार्यसंस्कृती अभियानास*पहिल्याच दिवशी प्रारंभ.

ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे *माजी अध्यक्ष स्वर्गीय नानासाहेब देविदास फालक यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना भुसावळ कला विज्ञान आणि पू. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात कार्यसंस्कृती अभियानास दिवाळीनंतरच्या सुट्ट्या संपल्या वर पहिल्याच दिवशी प्रारंभ करून अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सौ मीनाक्षी वायकोळे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य डॉ.एस व्ही पाटील, उपप्राचार्य डॉ. बी. एच बऱ्हाटे, उपप्राचार्य डॉ.एन . ई .भंगाळे, उपप्राचार्य डॉ. ए.डी गोस्वामी. उपप्राचार्य प्रा उत्तम सुरवाडे, पर्यवेक्षक श्रीमती प्रा शोभा तळेले, आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजक *उपप्राचार्य उत्तम सुरवाडे यांनी संकल्पना प्रास्ताविकात विशद केली. स्वर्गीय नानासाहेब फालक यांना *कमी बोलण आणि काम जास्त आवडायचं. म्हणून आपण शिक्षण क्षेत्रातील सर्व सहकारी प्राध्यापक बंधू-भगिनी आज पासून कार्यसंस्कृतीच्या अभियानास सुरुवात करून आगळीवेगळी आदरांजली स्वर्गीय नानासाहेब फालक यांना वाहात आहोत.
सुट्टी संपल्यानंतर विद्यार्थ्यांना वाटतं, शिक्षकांनी शिकवायला सुरुवात केल्यावर आपण महाविद्यालयात जाऊ, प्राध्यापकांना वाटतं विद्यार्थी वर्गात यायला लागल्यानंतर शिकवायला सुरुवात करू, यातच आठ-पंधरा दिवस निघून जातात. असे न करता कनिष्ठ महाविद्यालयातील प्रॅक्टिकल्स आणि तासिका पहिल्याच दिवशी सुरुवात करून कार्यसंस्कृती अभियानालासुरुवात केली.
कार्यसंस्कृती अभियानाचे अभिनव संकल्पना विशद करताना प्रा.उत्तम सुरवाडे म्हणाले की, कार्यसंस्कृती अभियान म्हणजे आपणच आपल्या कामाचे मालक,आपणच आपल्या कामाचं मूल्यमापन करायचं, काम केव्हा सुरू करायचा आणि केव्हा संपवायचं ते ठरवायच ही आपणच, आणि जे काम करायचं ते लादलेलं न मानता स्वयंस्फूर्तीने करायचं. याला म्हणायचं कार्यसंस्कृती अभियान.
हे कार्यसंस्कृती अभियान वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयात वर्षभर राबवले जाणार असल्याची माहिती या प्रसंगी त्यांनी दिली.
याप्रसंगी स्वर्गीय नानासाहेब देविदास पालक यांच्या आठवणींना मनोगत व्यक्त करताना प्राध्यापक बंधूंनी उजाळा दिला. कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. शाम दुसाने, वरिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने प्रा . अनिल हिवाळे, मनोगत व्यक्त करताना म्हणाले, स्वर्गीय नानासाहेब फालक जात धर्म पंथ न मानणारे व सर्वांना समान न्याय देणारे व्यक्तिमत्व होते. विद्यार्थिदशेत असताना आपला खांदा चळवळीसाठी दुसऱ्यांना वापरू द्यायचा नाही, हे नाना कडून शिकलो. उपप्राचार्य प्रा उत्तम सुरवाडे, यांनी नानांच्या सहवासातील आठवणींना उजाळा देत सांगितले की नानासाहेब फालक आणि माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यात मानलेल्या बहिण भावाचं नातं होतं . राष्ट्रपती झाल्यानंतर नानां मुळे राष्ट्रपतींना पत्र लिहिण्याचा सन्मान मला मिळाला आणि ओघाने त्यामुळे राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याची ही संधी मिळाली. नानांच्या अल्प भाषणाचा गोड किस्सा देखील त्यांनी यावेळी सांगितला. उपप्राचार्य प्रा. डॉ.ए. डी गोस्वामी. यांनी बस कंडक्टरच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांना अटक करून पोलीस स्टेशन मध्ये नेले, तेव्हा महाविद्यालयात संपर्क साधून वेळीच हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांची सुटका केल्याची आठवण सांगितली. प्राचार्य डॉ.मीनाक्षी वायकोळे यांनी प्राचार्य पदावर विराजमान झालेल्या व्यक्ती ने प्रशासन चालवताना कमीत कमी बोलावं आणि जास्तीत जास्त काम करावं’हा कारकीर्द यशस्वी करण्याचा मूलमंत्र नानासाहेबांनी दिला असे सांगितले. प्रशासन चालवताना प्राचार्य पदाची खुर्ची म्हणजे काटेरी मुकुट असतो त्याचं भान ठेवून काम करावं, हा धडा ही नानासाहेबांनीच दिला, असही त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ. ए.डी गोस्वामी यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कार्यालयीन अधिक्षक श्री भगवान तायडे मुख्य, लिपिक सचिन पाटील, समन्वयक श्रीमती स्वाती पाटील , प्रा. सौ. एम. आर. गुजर, प्रा.टी.एस .सावंत, प्रा.प्रशांत पाटील, प्रा महेश सरोदे, प्रा महेश गोसावी. वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button