Kolhapur

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त अनंतशांती व राजर्षी फाऊंडेशचा अनोखा उपक्रम

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त अनंतशांती व राजर्षी फाऊंडेशचा अनोखा उपक्रम

सुभाष भोसले कोल्हापूर

कोल्हापूर : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत राधानगरी तालुक्यातील आसनगाव पाट पन्हाळा या दोन गावातील ५० विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वितरण अनंतशांती बहुउद्देशीय सामाजिक संस्था व राजर्षी शाहू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच करण्यात आले.हे वितरण अनंतशांती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक भगवान गुरव व राजर्षी शाहू फाऊंडेशनचे संस्थापक नईम अत्तार यांच्या हस्ते करण्यात आले.
सामाजिक वारसा लाभलेली अनंतशांती सामाजिक बहुद्देशीय संस्था व राजर्षी शाहू फाउंडेशन समाजासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असते.संस्थेने गेली १३ वर्षे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत नावलौकिक मिळवला आहे.
संस्थेने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अती दुर्गम असलेल्या आणि मागास भागाची निवड करत ५० विद्यार्थ्यांना शालेय बॅग देण्याचा संकल्प केला. त्यानुसार राधानगरी तालुक्यातील आसन गाव आणि पाटपन्हाळा या गावाची निवड केली आणि शालेय बॅगचे वितरण केले.
या कार्यक्रम प्रसंगी भगवान गुरव, नईम अत्तार,अमर निळपणकर, संजय पाटील, सतीश म्हापसेकर, नियान अत्तार,प्रवीण खोत,संतोष फराकटे, अभय पाटील, जीवन भांदिगरे, भगवान रजपूत,संदीप पोवार, पत्रकार सुभाष चौगले आदी आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button