Amalner

?️ अमळनेर कट्टा…आणि सामान्य माणसाच्या सतर्कतेमुळे दोन अल्पवयीन मुलांची सुटका..!तर आरोपी अटकेत..!

?️ अमळनेर कट्टा…आणि सामान्य माणसाच्या सतर्कतेमुळे दोन अल्पवयीन मुलांची सुटका..!तर आरोपी अटकेत..!

जळगांव दि. 24/05/21 रोजी शनीपेठ हद्दीतील सुनिल बारेला नि. बडवणी याने इ. काजल वय १० वर्ष व मयुर वय ०९ वर्षे यांना पळवून नेले होते.ह्या संदर्भात जळगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यातील आरोपी व बालकांचा शोध घेण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांचे मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या टीम मागील पाच दिवसांपासून सदर व्यक्तीचा शोध घेत होत्या. मात्र आज दि. 01/06/21 रोजी अमळनेर हद्दीतील सामान्य नागरीक सुरेश पापाजी दामोडी यांना सकाळी 06.30 वा मारवड रोडने हॉटेल चिन्मय जवळ वरील बालक व आरोपी पायी जाताना दिसले. त्यांना
मुले पायी चालताना पाहून त्यांची दया आली व त्यांनी मो.सा. थांबवुन त्यांना विचारपुस केली. तेंव्हा संशयित इसमाने ही दोन्ही मुले माझे आहे आणि मी काम शोधत आहे असे सांगितले. यावर सुरेश दाभोडी यांनी वरील तीघाना म्हशीचे तबेल्यात काम मिळवुन देते असे सांगुन श्री विवेक भोई यांचे तबेल्यावर नेले. या वेळी काजलने ही व्यक्ती माझे वडील नाहीत असे सांगीतल्याने तसेच व्हॉट्सअपवरून मुलांचा फोटो व्हायरल झाल्याने श्री सुरेशा दामोडी व विवेक भोई यांनी
अमळनेर पोलीसांच्या मदतीने आरोपी व बालकांना प्रथम अमळनेर पो स्टे ला
आणले व नंतर शनीपेठ पोलीसांचे स्वाधीन केले आहे.
यावेळी अमळनेर पो स्टे चे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी दोन्ही जागृत नागरिकांचा सत्कार केला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button