पाचोरा

पाचोरा भडगाव तालुक्यातील अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीची खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केली पाहणी..

पाचोरा भडगाव तालुक्यातील अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीची खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केली पाहणी..

शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये शासनाकडून नुकसान भरपाई मिळेल — खासदार उन्मेश दादा पाटील

मनोज भोसले
पाचोरा — पाचोरा भडगाव तालुक्यातील अतिवृष्टी ग्रस्त शेतीची आज खासदार उन्मेश दादा पाटील यांनी पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार कैलास चावडे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस सदाशिव आबा पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष तथा माजी पंचायत समितीचे सभापती सुभाष पाटील, तालुका सरचिटणीस प्रदीप पाटील, तालुका कृषी अधिकारी ए. व्ही. जाधव, भाजपचे तालुका विस्तारक विकी देशमुख, कृषी पर्यवेक्षक व्ही. एस जाधव, सहाय्यक जितू पाटील, तलाठी युवराज पाटील, राजश्री पेंढारकर, माजी सरपंच रवी आबा पाटील , शेषराव चव्हाण,ग्रामसेवक , शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोह टार येथील बळीराम भोई, कैलास बळीराम पाटील यांच्या शेतातील नुकसानीची पाहणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केली. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शासनाकडे पाठवावेत, शेतकरी हवालदिल झाला असून त्याला मदतीची आणि सहकार्याची गरज असून शेताच्या बांधावर जावून पंचनामे करण्याचे आदेश सूचना यावेळी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी दिल्यात.अं तुर्ली खुर्द येथील शेतकरी पुरुषोत्तम विश्वनाथ पाटील, बाबाजी विरभान पाटील यांचा शेतातील मक्याच्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांना दिलासा दिला.

Leave a Reply

Back to top button