Amalner

शेतातून दुचाकी लंपास ..!मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!

शेतातून दुचाकी लंपास ..!मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!

अमळनेर शेतात लावलेली दुचाकी लांबवल्याची घटना अमळगाव येथे घडली आहे.
याबाबतीत मारवड पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील अमळगाव येथील रामकृष्ण सहादू चौधरी हे बसचालक १० ऑक्टोबर रोजी त्यांना सुट्टी असल्याने मुलगा दुर्गेश सोबत अमळगाव जळोद रोडवरील शेतात दुचाकीने ( एमएच-१९,बीएन-२९७१) गेले होते. ही दुचाकी शेताजवळ लावली असताना शेतातून परतल्यावर दुचाकी दिसून आली नाही. तिचा शोध घेऊनही ती मिळून आली नाही. चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोना सुनिल तेली हे करीत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button