Bharat

?️ दोन मुलाखती..दोन्ही करोडपती व्यक्तींच्या..फरक मात्र जमीन अस्मान चा वाचा काय आहे मुलाखतीत…

?️ दोन मुलाखती..दोन्ही करोडपती व्यक्तींच्या..फरक मात्र जमीन अस्मान चा वाचा काय आहे मुलाखतीत…

प्रा जयश्री दाभाडे

काही दिवसांपूर्वी दोन मुलाखती वाचण्यात आल्या त्यात एक सौ.नीता अंबानी आणि दुसरी श्रीमती सुधा मूर्ती ह्यांची होती.
पहिली मुलाखत नीता अंबानीनी ज्यात त्यांच्या श्रीमंती आवडीनिवडी सांगितल्या त्यात त्यांनी त्या तीन लाख किंमत असलेल्या कपातून चहा पितात,
लाखाच्या वरती ज्यांच्या किमती आहेत आणि ज्याच्यावर हिरे जडलेले असतात अशा पर्सेस आणि चप्पल वापरतात इ चा उल्लेख केला आहे.

तसेच एकदा वापरलेली कमीत कमी लाख रु ची घरात वापरत असलेली चप्पल त्या पुन्हा वापरत नाहीत. करोडोंच्या घरातब किंमत असलेल्या घड्याळांचा त्यांना शौक आहे. खूप घड्याळींचा संग्रह त्यांच्या कडे आहे.हे आणि बरच काहीत्यांनी आपल्या मुलाखतीत सांगितलं…..

याच दरम्यान दुसरी मुलाखत वाचावयास मिळाली ती होती इन्फोसिस च्या श्रीमती सुधा मूर्ती ह्यांची…
त्यांच्या मुलाखतीत त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही करोडोंच्या मालकीण आहात, पण तो पैसा तुम्ही गरजू लोकांकडे वळवता? …….!

गेल्या पंधरा वर्षात स्वतःसाठी एकही नवीन वस्तू तुम्ही घेतली नाहीत?
तुम्ही एका साध्या घरात रहाता, प्रवासही नेहमी रेल्वेच्या जनरल बोगीतून करता तुम्हाला कधी श्रीमंत आयुष्याचा मोह नाही होत का ? एकीकडे लोक स्वतःची श्रीमंती दाखवण्यासाठी काय काय प्रकार करतात, मग तुम्ही इतकं साधं आयुष्य कस का जगता ? त्यावर त्यांनी अतिशय सुंदर उत्तर दिल ते अस :-

त्या म्हणाल्या,
समाजातील प्रत्येक व्यक्ती ही एक स्वतंत्र बेट असते आणि तुम्ही त्याच्याशी फक्त एकाच ब्रिजद्वारे रिलेट होऊ शकता तो ब्रिज म्हणजे त्यांच्याशी तुमचा भावनिक संवाद…….!
नातं निर्माण होण्यासाठी नेहमीच पैसा उपयोगी पडत नाही तर त्यासाठी गरज असते ती संवेदनशीलता आणि प्रेमळ शब्दांची.
पैशापेक्षा तुम्ही कुणाचं दुःख जेव्हा सहानुभूतीपूर्वक ऐकता तेव्हा ती गोष्ट त्यांच्यासाठी महत्वाची ठरते

मी एका उच्च शिक्षित पण मध्यमवर्गीय कुटुंबातून आले आणि नंतर समाज सेवेत रुजू झाले. मी समाजातील इतकी दुःख बघितली की माझी पैशा प्रतीची आसक्ती निघून गेली. मला माझ्या व्यक्तिगत आयुष्यात समाजसेवेतून समाधान मिळत. मला श्रीमंतीच प्रदर्शन करण्याची गरजच वाटत नाही. अशा प्रदर्शनातून काय दाखवायचं आणि कुणाला दाखवायचं आहे ? जीवनाकडे मृत्यूच्या नजरेतून बघितलं पाहिजे. आपल्या हिंदू धर्मात भगवत गीतेत आणि गौतम बुद्धांनीही सांगितलं आहे की जग आणि जीव नश्वर आहेत. मग जे नश्वर आहे त्याचा मोह कशासाठी……!

एकीकडे देशातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तीची पत्नी असणारी एक स्त्री जी त्या श्रीमंतीचं स्टॅंडर्ड मेंटेन करताना लाखोंचा चुराडा सहज करते.

एकदा घातलेली लाखोंची चप्पल ती पुन्हा वापरतही नाही. आणि दुसरीकडे काही हजारांसाठी देशातील गरीब शेतकरी आणि त्यांचं कुटुंबीय स्वतःच आयुष्य संपवतात.
एकीकडे एक वेळ जेवून उपासमार सहन करणारा समाज तर दुसरीकडे पैशाचा अक्षरशः अपव्यय करत जगणारी मंडळी.

माननीय श्रीमती सुधा मूर्ती ह्या खरोखरीच आदरणीय आहेत
कारण आज त्यांच्याकडे येणारा प्रत्येक पैसा त्यांची समाज हिताकडे वळवला आहे. त्यांच्यासारखी अनेक मंडळी आहेत जी साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी आचरणात आणून जगत आहेत.. ….

आपल्याच देशात असलेल्या ह्या दोन उच्च विभूषित, श्रीमंत स्त्रियांची विचारसरणी ऐकून आणि वाचून डोकं ,मन विचारात पडलं……….!!

काही क्षण कोण चूक कोण बरोबर? हा प्रश्न ही पडला..योग्य अयोग्य ची झुंबड ही उडाली..
मग एकच मनात आलं की
माझं उर्वरित आयुष्य श्रीमती सुधा मूर्ती यांच्या सारख जगण्याची आदिम बुद्धि दे.
त्यांचे जीवन हे एक पुस्तक आहे आणि या पुस्तकातील प्रत्येक पानावर अनुभव,साधे पणा, गरिबांसाठी तळमळ,उच्च विचार आणि गर्वहीन चारित्र्य आहे..तसं जगण्याची उमेद आणि प्रेरणा मला मिळत राहो य0ती इतरांनाही मिळो…

Leave a Reply

Back to top button