Ahamdanagar

कोपरे येथे तुळजाभवानी, येडूबाई,मळगंगा, बाळूमामा मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न

कोपरे येथे तुळजाभवानी, येडूबाई,मळगंगा, बाळूमामा मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न

अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी

नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कोपरे येथे हनुमान टाकळी-कोपरे ग्रामस्थांच्या वतीने तुळजाभवानी, मळगंगा, येडूबाई,बाळूमामा मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा थाटात संपन्न झाला.हनुमान टाकळी ते कोपरे पर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती. होम,हवन,गोंधळ, हरिपाठ,जागर भजन,किर्तन, अन्नदान असे विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.ह.भ.प. रोहित सावंत, लक्ष्मण कराड,सुरेश कोळेकर, परमेश्वर जायभाय यांची किर्तने झाली.देवीभक्त आदिनाथ आव्हाड, किसनराव आव्हाड आणि टाकळी कोपरे ग्रामस्थ यांच्या पुढाकाराने हा सोहळा संपन्न झाला. पंचक्रोशीतील अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button