रावेर

खरी वर्ष अखेर…

खरी वर्ष अखेर…

विलास ताठे

आज ३१ डिसेंबर २०१९ या वर्षाअखेरच्या दिवशी आम्ही सर्वांनी निंभोरा येथील वाघोदा रस्त्यावरील स्मशान भूमीत सफाई अभियान राबविण्यात आले यावेळी स्मशान भूमी परिसरात वाढलेले गवत, काटेरी झुडपे,अस्ताव्यस्त वाढलेल्या झाडांची छाटणी,कोरडा कचरा,पाने ,प्लास्टिक आदींची साफसफाई करीत स्वच्छता केली.यावेळी स्वानंद कृषी विज्ञान मंडळ,युवा रसिक मंडळ व युवाशक्ती मित्रपरिवाराचे कार्यकर्ते यांसह ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी डॉ. एस डी चौधरी,प्रल्हाद बोंडे,मोहन बोंडे,शंकर सरोदे,योगेश कोळबे,गुणवंत भंगाळे,सुधीर मोरे,गिरीश नेहेते,रवींद्र भोगे,सचिन चौधरी,मोहन भंगाळे, विवेक बोंडे,धीरज भंगाळे,विजय सोनार,संजय महाजन टेलर,बापूसाहेब रजाने,राकेश सपकाळे,हर्षल ठाकरे, चेतन महाले,वसीम शेख,योगेश सपकाळे,गिरीश सोनवणे,विजय चोपडे,निलेश भंगाळे, राहुल महाले,ललित दोडके,संजय आदिवाल,विनोद गोराडकर, यांसह आदी तरुण उपस्थित होते.यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामविकास अधिकारी गणेश पाटील यांनी स्मशान भूमी परिसरातील डेरेदार वृक्षांना रंग उपलब्ध करून देण्यात आला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button