India

? ? आदिवासी हिंदू नाहीत,वनवासीही नाहीत..आदिवासींचं हिंदूकरण व्यवस्थेच मोठंच षडयंत्र

आदिवासी हिंदू नाहीत,वनवासीही नाहीत..आदिवासींचं हिंदूकरणं व्यवस्थेचं मोठंच षडयंत्र

केवळ भारतातलेच नव्हेत तर जगातले सगळेच आदिवासी हे निधर्मी आहेत जगातल्या कोणत्याही आदिवासींनी धर्म स्थापन केला नाही. जगातल्या कोणत्याही आदिवासींची धर्म ही ओळख कधीच नव्हती आणि नाहीच. आदिवासींची विशिष्ट संस्कृती हीच त्यांची ओळख आहे.

हिंदू हा धर्म भारतातला सगळ्यात जुना प्राचीन धर्म असे सांगितले जात असले तरी त्यात काहीही तथ्य नाही. या देशात जे सात ते साडेसातहजार वर्षांपूर्वी बाहेरून आलेल्या मानवी आर्य टोळ्या होत्या. त्यांना मूळचे याच देशातील वंशज दाखविण्यासाठी केलेला तो एक खटाटोप आहे.
१४५२मध्ये पोर्तुगीज पोप निकेलस या धर्मगुरुच्या आदेशानुसार अल्फन्सो आणि बुलरोमन या ख्रिश्चन राजांद्वारा जगामध्ये धर्मप्रसार करण्यासाठी व वसाहती निर्माण करण्यासाठी माणसे पाठविण्यास सुरुवात झाली. १४५२ पूर्वी जगातले सगळे आदिवासी समूह कोणत्याही धर्मात नव्हते. नंतर काही आदिवासींवर धर्म लादला गेला. जगातला एखादा धर्म स्वीकारावा लागू नये म्हणून ज्यू लोकांनी जुडाई धर्म स्थापन केला. ( UNO )संयुक्त राष्ट्र संघटनेने आदिवासींची केलेली परिभाषा यात धार्मिक तत्वे बसत नसल्याने ते आदिवासी स्वतःला सिद्ध करू शकले नाहीत.

१९९३-९४ साली संयुक्त राष्ट्र संघाने WGIP द्वारा आदिवासी विषयावर चर्चा करून आदिवासींची सांस्कृतिक मूल्ये, जीवनपद्धती , पारंपरिक समाजरचना यांचा अभ्यास करून आदिवासींना मूळनिवासीचा दर्जा बहाल केला.
आदिवासींना काही पारंपरिक हक्क बहाल केले.
इंग्रज भारतात येण्यापूर्वी भारतात वर्णव्यवस्था होती. तेंव्हा आदिवासी या वर्णव्यवस्थेत नव्हते.
१८६४ चा कायदा होईपर्यंत भारतातले आदिवासीं हे आदिवासीच होते.

इंग्रज मिशनरी आल्यानंतर काही आदिवासींना ख्रिश्चन बनविले गेले.नंतर इंग्रजांनी जेंव्हा जाती धर्मावर आधारित जनगणना सुरू केली तेंव्हा कोणताही धर्म न स्वीकारलेल्या आदिवासींना निसर्गपूजक म्हटले गेले. वैदिक संस्कृतीच्या वर्णव्यवस्थेतही आदिवासी नव्हते. नंतर शेवटच्या शूद्र या वर्णात अतिशूद्र म्हणून उल्लेख केला गेला. इथेच खऱ्या अर्थाने बहुतांशी आदिवासी हिंदू बनविला गेला. *हिंदू धर्म ही संकल्पना इंग्रज इथे आल्यानंतर आकारास आणली गेली.* यात इंग्रजांचाही फायदाच झाला. धर्माच्या नावावर इथला समाज दुभंगून त्यांनी राज्य केले. इंग्रज इथे येण्यापूर्वीच्या कालखंडातील कोणत्याही साहित्यात हिंदू धर्म शब्द सापडत नाही.

आदिवासींना हिंदू बनविणे हे RSS वाल्यांचे षडयंत्र-

वनवासी कल्याण आश्रम स्थापून आदिवासींना आदिवासी या शब्दाऐवजी ‘वनवासी’ संबोधन लावणे व सांस्कृतिक आदिवासींना हिंदू धार्मिक बनविणे या उद्देशापायी वनवासी कल्याण आश्रमाची स्थापना केली गेली. कारण जोपर्यंत भारतातले आदिवासी पूर्णपणे हिंदू होत नाहीत तोपर्यंत भारत हा हिंदूराष्ट्र घोषित होणार नाही.यात कोणत्याही पक्ष किंवा संघटनेत असलेले बिगर आदिवासी हिंदू लोक यांचे दोन फायदे होणार आहेत.

1) भारत हिंदू राष्ट्र घोषित झाले तर आदिवासींची स्वतंत्र ओळख मिटून आदिवासी हिंदू धर्माचाच एक भाग होतील. त्यामुळे UNO ने घोषित केल्यानुसार भारताल्या आदिवासींना मूलनिवासीचा दर्जा मिळणार नाही. त्यामुळे आदिवासींना जागतिक मूलनिवासी हक्क जाहीरनामा लागू पडणार नाही.

2) भारतात आर्य बाहेरून आले होते. या विधानाला लोक विसरतील. भारतात कोणीच बाहेरून आलेले नाहीत हे जगासमोर सिद्ध झाले तर भारतातले सगळेच लोक मूळचे इथलेच. त्यामुळे केवळ स्वतःस आदिवासी म्हणवून घेणाऱ्यांना UNO चा जागतिक मूलनिवासी जाहीरनामा लागू पडणार नाही. तसेच हिंदू धर्माच्या नावाने राजकारण करून मोठी व्होट बँक तयार होईल. कायम सत्तेत येण्यासाठीही त्याचा फायदाच होईल.

यामुळेच भारतात जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यास RSS चा विरोध आहे.
RSS ची स्थापना १९२५ साली झाली होती. २०२५ साली त्या संघटनेला दसऱ्याच्या मुहूर्तावर १०० वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने भारत हिंदुराष्ट्र घोषित करण्यासाठी त्यांचे 100% प्रयत्न राहतील.

आदिवासींनो… आता तरी सुधरा…!

आदिवासी हा इतर समाजापासून वेगळा स्वतंत्र संस्कृति असलेला समाज.त्याची दैवतं वेगळी,त्याची पुजापद्धती वेगळी,त्याच्या परंपरा वेगळ्या …आदी अनेक बाबतीत त्याचं वेगळेपण गृहीत धरलं जातं.

भारतातील आजचा आदिवासी एवढा हिंदुमय झालेला आहे की मग या देशातला नेमका आदिवासी कोण ?असा प्रश्न पडला तर नवल ते काय? माझा हिंदू धर्माला अजिबात विरोध नाही.फक्त विरोध आहे तो

भोळ्या भाबड्या आदिवासींना हिंदू बनवून त्यांचे शोषण करण्याचा.
आदिवासींना हिंदू बनवल्यामुळे ब्राह्मणांनी जे चार वर्ग पाडले होते ब्राह्मण, क्षत्रिय,वैश्य आणि शूद्र त्यातील शूद्र या वर्गातील आदिवासींना दाखवले गेले.

मनुस्मृतीनुसार शूद्र या वर्गातील लोकांनी ब्राह्मण,क्षत्रिय व वैश्य या लोकांची चाकरी करावी असे सुचवले आहे.

आदिवासींना शूद्र वर्गात समाविष्ट केल्यामुळे चाकरी करणाऱ्यांची संख्या तर वाढलीच पण जे ब्राह्मण लोक त्यांनी निर्माण केलेल्या देवांच्या नावावर जगतात.किंवा हिंदू धर्मातील वेगवेगळ्या पूजा वगैरे यांवर पोट भरतात त्यांच्या गिऱ्हाईकांची संख्या वाढली.मला हिंदू धर्माच्या तत्वज्ञानावर टीका करायची नाही पण एक सत्य सांगतो.
जे सगळ्यांच्या डोळ्याला दिसते पण दुसरा करतो म्हणून आपण करायचे किंवा आपल्या वाडवडिलांनी केलं म्हणून करायचं म्हणून करतात.

पण स्वतःच्या डोक्याचा वापर अजिबात करत नाहीत.

एक सांगतो,गीते मध्ये कृष्णानेअसं म्हटलं आहे की ,आपण फक्त कर्म करायचं फळाची अपेक्षा अजिबात करायची नाही.हे तत्वज्ञान ब्राह्मणांना पाळायला सांगा, त्यांना म्हणावं, तुम्ही फक्त पूजा करा.मग ती कुठलीही असो, नारायण नागबली, सत्यनारायण, किंवा वास्तुशांती पण पैसे बियसे काही मागू नका.कारण पूजा हे देवाचे काम आहे.त्याच्यासाठी कशाला पाहिजेत पैसे?तुम्ही फक्त पूजा करण्याचे कर्म करा. पूजा करण्याचे फळ म्हणजे जे तुम्हाला पैसे मिळतात त्याची अपेक्षा करू नका.देवच तुम्हाला काय द्यायचे ते देईल.मला नाही वाटत कोणी ब्राह्मण फुकट पूजा करून देईल.मी ब्राह्मणांवर बोलतोय म्हणजे आख्या ब्राह्मण जातीला बोलतोय असे नाही.ब्राह्मण समाजात जन्मलेली काही चांगली माणसेही आहेत. मग ते दाभोलकर असतील, श्याम मानव असतील…ही माणसे लोकांना सातत्याने सत्य सांगण्याचा प्रयत्न करत होती पण आपली मानसिक गुलामी इतकी कि आपण त्यांचे म्हणणे समजून घाययलाच तयार नाही.ब्राह्मण ही काही जात नाही ती एक प्रवृत्ती आहे.अशी प्रवृत्ती जी दुसऱ्या माणसाला मानसिक गुलाम बनवून आपले वर्चस्व निर्माण करते.प्रत्येक समाजात असे प्रवृत्तीवले ब्राह्मण असतातच .आता तर आदिवासींमध्येही ब्राह्मण वर्ग तयार झालाय .तो लग्ने लावून देतो.पंचांग पाहतो.वेगवेगळ्या पूजा करून देतो.अशा या प्रवृत्ती समाजात वाढल्या की, या लोकांकडून पूजा अर्चा करवून घेणारीं माणसे पुरती या लोकांच्या अधीन होतात.इथेच जन्म घेतो वर्चस्ववाद! इथेच तयार होते श्रेष्ठ आणि कनिष्ठत्वाची भावना.इथेच सुरु होते मानसिक गुलामी.

आदिवासींचं तत्वज्ञान अगदी याच्या उलट आहे.इथे कोणीही श्रेष्ठ कनिष्ठ नाही.इथे सगळ्यांचाच गुरु एकच तो म्हणजे निसर्ग.इथे पूजेच्या नावाने कोणताही व्यवसाय चालत नाही.कोणत्याही देव, दैवतांच्या नावाने मोठमोठाली मंदिरे उभारली जात नाहीत.
आदिवासींचे देव हे निसर्गात, मोकळ्या माळांवर, वाऱ्या पावसाची, उन्हाची त्यांना फिकीर नसते.ते कोणतेही दान मागत नाहीत.

अशा देवांना सोडून आदिवासी आज हिंदू संस्कृतीतल्या देवांकडे वळलाय.त्यामुळे स्वतःची संस्कृती देव,दैवते तो विसरत चाललाय.आणि हेच भारतातल्या बाहेरून आलेल्या लोकांना हवंय.आदिवासी जेवढ्या लवकर हिंदूंचे देव स्वीकारेल, जेवढ्या लवकर हिंदूंचे सण उत्सव साजरे करेल तेवढ्या लवकर आदिवासींची ओळख त्यांना पुसता येईल.मग त्यांना हे सिद्ध करता येईल की भारतात राहणारा आदिवासी हा हिंदू आहे.त्यांची संस्कृती हि हिंदूंचीच संस्कृती आहे.त्यांची दैवते, चालीरीती,पूजा अर्च्या ह्या हिंदू धर्मातीलच आहेत.त्यामुळे भारतात वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती असलेला कोणताही वेगळा समाज नाही.त्यामुळे आदिवासी म्हणून जे विशेष अधिकार व हक्क जागतिक संघटना देईल.ते सर्व अधिकार व हक्क सर्व हिंदुधर्मीयांना मिळावेत.सर्वहिंदू धर्मीय हे येथले आदिवासींचं आहेत.त्यामुळे या देशाचा मूळ मालक,मूळ रहिवाशी हा इथला हिंदूच आहे. अशी मागणी ते जागतिक संघटनेकडे करू शकतात.

आदिवासी दिनाला भारतातच विरोध का केला गेलाय याला हेच कारण आहे .जे आदिवासी वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून आदिवासींना हिंदू बनविण्याचा प्रयत्न करतात. ते फक्त स्वतःच्या स्वार्थापायी किंवा त्यांना आदिवासी विषयी असलेले अज्ञानामुळे.

फक्त आजकाल हिंदू सणांच्या नावाने शुभेच्छा देणाऱ्या व वर्गण्या काढुन हा उत्सव साजरा करणाऱ्या आदिवासींना मला एक विचारावेसे वाटते? काहो, तुम्ही आदिवासी दिनाबद्दल चार दोन ओळी लिहून एखाद्या ग्रुपवर शुभेच्छा दिल्या होत्या.?समाजासाठी थोडीफार वर्गणी जमा केली होती?
तुम्हाला आदिवासींचे उत्सव साजरे करायला लाज वाटत असेल ,आदिवासींचे देव घरात ठेवायला लाज वाटत असेल तर म्हणाना स्वतःला मी आदिवासी नाही म्हणून! आदिवासी समाजाच्या नावावर मिळवलेल्या सवलती असतील, नोकऱ्या असतील द्या सोडून.ओपनमधून ट्राय करा नोकऱ्यांसाठी.मग खुशाल जगा त्यांचे अंडर. आम्हाला गुलामी नकोय.आम्ही आदिवासी आहोत.तुम्ही दूर झाले तर खऱ्या आदिवासी बांधवाना नोकऱ्या आणि सवलती मिळतील.पण तुमच्यामुळे जर आदिवासींची खरी ओळख पुसली जात असेल तर आम्हाला तुंमच्याविरुद्धच पहिल्यांदा समाज उभा करावा लागेल.समाजाचं नुकसान करणाऱ्यांना धडा शिकवावा लागेल.
जरा कडवट बोललो असेन पण त्याशिवाय पर्याय नाही.तशी वेळच आलीय.फक्त समाजासाठी…

आदिवासींवर हिंदू संस्कृती का लादली जातेय?

भाजप असो की काँग्रेस किंवा कुठलाही पक्ष असुदे, आदिवासींच्या स्वतंत्र अस्तित्वासाठी कोणीही प्रयत्न करणार नाही.कारण हे सर्व पक्ष बिगर आदिवासींनी स्थापन केले आहेत.अन त्यांना माहिती आहे की केवळ आदिवासीच येथले मूळचे रहिवासी आहेत.

जर आदिवासींची ओळख येथले मूळचे रहिवासी म्हणून निर्माण झाली तर आपण बिगर आदिवासी सर्व येथले उपरे बाहेरून येऊन इथे स्थायिक झालेले ठरू.अन मग या देशाचा मूळ मालक फक्त आदिवासीच होईल.म्हणून संयुक्त आंतरराष्ट्रीय संघटनेने ,युनोने दिलेले विशेष अधिकार फक्त तेवढ्या आदिवासींनाच मिळतील.या देशातल्या नैसर्गिक संपदा, जल,जमीन, जंगल यांवरचा हक्क फक्त आदिवासींचाच राहील.ही भीती त्यांना वाटते.म्हणून काहीही करून आदिवासींना हिंदू बनवा.हा उद्योग कळत नकळत चालू आहे.
भोळ्या भाबड्या अशिक्षित आदिवासींवर तो प्रयोग चालू आहे.तसेच आदिवासींचा नीट इतिहास माहीत नसलेले शिकले सवरलेले आदिवासीही फसतात.

खरं तर नोकरीच्या फॉर्मवर कॅटेगिरी सोडून धर्म लिहिण्याची काहीच गरज नव्हती पण भारतात तशी पद्धत निर्माण करून आदिवासींच्या आदिम धर्माचा उल्लेखच ठेवला नाही.त्यांना हिंदू धर्मात कोंबण्यात आले.म्हणून आदिवासीं हिंदू धर्म लिहू लागले.

या 1950 पूर्वीच्या इंग्रजानी केलेल्या जनगणना पहा.आदिवासी कधीही हिंदू धर्मात नव्हता.त्यांना निसर्गपूजक व 1931 च्या जनगणनेत “आदिम” धर्माचे म्हंटले आहे.पण इंग्रज गेले आणि 1950 च्या संविधानात आदिवासींना हिंदू कल्पिले गेले. शेड्युल्ड ट्राईब नावाची सूची बनवून त्यात आदिवासींना घालण्यात आले.इथेच आदिवासींची खरी ओळख पुसण्यात आली.खरं तर संविधानात आदिवासींसाठी indigenous people(मुळनिवासी) किंवा Aborigines people(आदिवासी वंश) असा शब्द पाहिजे होता.आदिवासींचे संविधान निर्मितीतले मेम्बर जयपाल मुंडा यांनी तसे सांगूनही ते एकटे असल्याने त्यांचे कोणी ऐकले नाही.

भारतातल्या आदिवासींची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख होऊ द्यायची नव्हती म्हणून युनोने सांगितल्याप्रमाणे साऱ्या जगात 21 डिसेंबर 1993 ते 20 डिसेंबर 2004 पर्यंत आदिवासी दशक पाळले गेले परंतु भारतात ते पाळले गेले नाही.तसेच भारत कधीच शासकीय पातळीवरुन दरवर्षी 9 ऑगस्ट हा “आदिवासी दिन” म्हणून साजरा करत नाही.

आदिवासी लोक व संघटना स्वतःच्या पुढाकाराने माहिती मिळाल्यानंतर आदिवासी दिन साजरा करायला लागले.आदिवासी मंत्री फक्त औपचारिकता म्हणून या कार्यक्रमांना उपस्थित राहतात.

1994 मध्ये जीनेव्हा येथे जेंव्हा आदिवासी संमेलन होते तेंव्हा भारतातूनही आदिवासींचे प्रतिनिधी मंडळ बोलवले होते पण भारताने कोणतेही आदिवासी प्रतिनिधी न पाठवता बिगर आदिवासींचे केंद्रीय राज्य मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एकप्रतिनिधी मंडळ पाठवून असे खोटे सांगितले की युनोने जी आदिवासी म्हणून व्याख्या सांगितली आहे. तसे भारतात वेगळी व स्वतंत्र संस्कृती,भाषा असलेले लोक राहात नाहीत.जर तुम्हाला भारतात आदिवासी समुदाय जाहीरच करायचा असेल तर भारतात सगळे हिंदू धर्मीयच आदिवासी म्हणून पात्र होतील.कारण येथले मूळचे लोक हिंदू संस्कृतीचे आहेत.
एवढे खोटे आंतरराष्ट्रीय समुदयासमोर बोलले गेले आहे. ही भारतातल्या आदिवासींवर फार मोठी अन्यायकारक गोष्ट आहे.

आदिवासींना पूर्ण हिंदू दाखवण्यासाठी मग हर तऱ्हेचे प्रयत्न केले जात आहेत.त्यासाठी मग खोटे दाखले देऊन बोगस आदिवासी नोकरीत घुसवणे, धनगरांसारख्या जमाती आदिवासींत घुसवणे आदी प्रकाराबरोबरच आदिवासींचे “आदिवासी” हे संबोधन विसरविण्यासाठी त्यांना “वनवासी” किंवा फक्त “अनुसूचित जमाती” म्हणणे.

आदिवासींना हिंदू देवदेवतांच्या पूजेची सवय लावणे, आदिवासींना हिंदूपद्धतीच्या चालीरीती व सण उत्सव करण्याची सवय लावणे आदी सूक्ष्म नियोजन करून कामे चालू आहेत. जी आदिवासींच्या लक्षात येत नाहीत.

तेंव्हा आदिवासिनो,सावधान! तुमची स्वतंत्र ओळख होती धोक्यात आहे.वेळीच सर्वसावध व्हा.आपण बिघडू नका.नाहीतर तुमच्या पुढील पिढ्या आपल्याला शिव्या घालतील.

रावण भक्त आदि.संजय भांगे
बिरसा ब्रिगेड कार्यकर्ता
पुणे जुन्नर

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button