Akola

? Big Breaking..आदिवासी युवकांना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची मारहाण खेकडे पकडण्यासाठी गेले होते युवक…८ वन कर्मचार्‍यावर गुन्हे दाखल

? Big Breaking..आदिवासी युवकांना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची मारहाण खेकडे पकडण्यासाठी गेले होते युवक…८ वन कर्मचार्‍यावर गुन्हे दाखल

प्रतिनिधी: विलास धोंगडे

काळाकामठा येथील आदिवासी युवकांना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची मारहाण केल्याची घटना दि २१ सप्टेंबरच्या राञी घडली हे युवक मेडशी जवळ नदीमध्ये खेकडे पकडण्यासाठी गेले होते याबाबत काळाकामठा येथील अनिल महादेव शिंदे यांनी मालेगाव पोलिसात फिर्याद दिली की २१ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या दरम्यान घरून त्याचे मिञ अमोल श्यामराव लोखंडे व देवानंद बजरंग शिंदे यांचेसह मेडशी जवळील धरणाच्या साडंवयाखाली पुलाजवळ खेकडे पकडण्यासाठी निघाले त्यांनी राञी ११ वाजेपर्यंत खेकडे पकडले घरी परत जाणयासाठी पुलाजवळील मोटारसायकल जवळ आले त्यावेळी वनविभागाची जिप तिथे आली त्यानी त्याना काय आहे असे विचारले असता त्यांनी खेकडयाबद्दल सांगितले. त्यावेळी त्या ड्रायव्हर ने खेकडे मागीतले युवकांनी खेकडे देण्यास नकार दिल्यावर मारहाण केली व मोटरसायकल ची चाबी काढून घेतली तेव्हा गाडीतून ३ कर्मचारी उतरले त्यानी त्या युवकांना थापडा बुक्क्यांनी मारहाण केली. गाडीत बसून वनविभागाच्या डेपोत नेले. त्यांनी या यूवकाजवळचे बॅटरी खेकडे जाळे मासे जबरदस्ती ने घेतल्या तूम्ही लाकूड चोर आहात असे म्हणून कर्मचार्‍यांनी लाकडी काठी दंडे रॅफटर बूंटाच्या लाथा थापडाणी मारहाण केली जातिवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली पोलीसांनी ८ वन कर्मचाऱ्यांच्या विरोधात भांदवि कलम 143 147 148 149 342 323 324 नुसार गुन्ह्याची नोंद केली आहे.

? Big Breaking..आदिवासी युवकांना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची मारहाण खेकडे पकडण्यासाठी गेले होते युवक...८ वन कर्मचार्‍यावर गुन्हे दाखल

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button