Ratnagiri

गटशिक्षणाधिकारी दापोली पदभार स्वीकारल्याबद्धल अण्णासाहेब बळवंतराव यांचा आदिवासी संघटनांतर्फे सत्कार गटशिक्षणाधिकारी दापोली पदभारावरून वातावरण तापले होते

गटशिक्षणाधिकारी दापोली पदभार स्वीकारल्याबद्धल अण्णासाहेब बळवंतराव यांचा आदिवासी संघटनांतर्फे सत्कार गटशिक्षणाधिकारी दापोली पदभारावरून वातावरण तापले होते

रत्नागिरी : प्रभारी गटशिक्षणाधिकारी संतोष भोसले यांची बदली खेड येथे झाल्यामुळे दापोली येथील गटशिक्षणाधिकारी पद रिक्त झाले होते. हे प्रभारी गटशिक्षणाधिकारी पद आपल्याला मिळावे म्हणून काही जुनीअर शिक्षण विस्तार अधिकारी यांनी राजकीय सेटींग लावली होती. प्रभारी गटशिक्षणाधिकारी पदभारावरून दापोलीत चांगलेच वातावरण तापत होते.वादग्रस्त शिक्षण विस्तार अधिकारी विजय बाईत यांना पदभार देऊ नका, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी मागणी सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल व ऑल इंडिया आदिवासी एम्पलाईज फेडरेशन रत्नागिरी यांनी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी , शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी , गटविकास अधिकारी दापोली व सभापती दापोली यांना निवेदन देऊन विरोध केला होता.त्यामुळे प्रभारी गटशिक्षणाधिकारी संतोष भोसले यांची बदली खेड येथे झाली तरी शिक्षण विभाग रत्नागिरी यांनी संतोष भोसले यांच्या कडेच पदभार ठेवला होता.माञ त्यांना खेड येथे कार्यमुक्त केल्यानंतर दापोलीत सिनियर असलेले शिक्षण विस्तार अधिकारी अण्णा साहेब यांना रितसर पदभार देण्यात आला आहे.
हा पदभार अण्णासाहेब बळवंतराव यांनी परवाच स्वीकारल्याबद्धल सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल,दत्तात्रय वाघमारे तालुका अध्यक्ष ऑल इंडिया आदिवासी एम्पलाईज फेडरेशन ,अरूण वळवी ,नितीन शिंदे इत्यादी शिक्षक कर्मचारी बांधवांनी पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला. व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. आदिवासी संघटनांचे नवीन गटशिक्षणाधिकारी यांना पूर्ण सहकार्य राहील,असे सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी यावेळी सांगितले व आदिवासी शिक्षक कर्मचारी यांचे काही विषय थोडक्यात सांगितले.आदिवासी शिक्षक कर्मचारी यांचे समस्या सोडवणार असल्याचे नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी अण्णा साहेब बळवंतराव यांनी सांगितले.
अण्णा साहेब बळवंतराव यांना रितसर गटशिक्षणाधिकारी पदभार दिल्याबद्दल शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद रत्नागिरी यांना सुशीलकुमार पावरा यांनी आभार पत्र पाठविले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button