Arni

आदिवासी विकास विभाग आयुक्त यांना बरखास्त करा, आँट्रोसिटी दाखल करण्याची मागणी – आर्णी येथे उमटले पडसाद

आदिवासी विकास विभाग आयुक्त यांना बरखास्त करा, आँट्रोसिटी दाखल करण्याची मागणी – आर्णी येथे उमटले पडसाद

आर्णी / प्रतिनिधी – निलेश उखंडे

बिरसा क्रांती दल आर्णी तालुक्याच्या वतीने तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी आदिवासी विकास विभाग नाशिक आयुक्त किरण कुलकर्णी यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच पदावरून तात्काळ बरखास्त करण्यात यावी अशी मागणी केली.

आदिवासी विकास विभाग आयुक्त यांना बरखास्त करा, आँट्रोसिटी दाखल करण्याची मागणी - आर्णी येथे उमटले पडसाद

28 जानेवारी 2020 च्या दैनिक लोकमत हेलो पुणे या स्थानिक आवृत्तीत ॲग्रो रेव्होल्युशन या घैसास यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या सोहळ्याचे वृत्तांत आहे या प्रकाशन कार्यक्रमात आदिवासी विकास विभागाचे नाशिक येथील आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी व संचेती संस्थापक डॉ. कांतीलाल संचेती यांनी समग्र आदिवासी समाजाचा अपमान करणारे वक्तव्य केले आहे या दोघांनीही आदिवासी समाज समाजाला वनवासी संबोधले आहे वनवासी हा शब्द आदिवासी मूलनिवासी समाजाचे अस्तित्व व अस्मिता नाकारणारा आहे तसेच वनवासी हा शब्द आदिवासी समाजाच्या भावना दुखणार व आपमान करणार आहे डॉ. किरण कुलकर्णी तर आदिवासी विकास विभागाचे आयुक्त आहेत ते जर आदिवासी समाजाला वनवासी संबोधत असतील तर त्यांच्या मनात आदिवासी समाजाबद्दल किती प्रेम आहे हे दिसून येते अशा विचारांचा माणूस आदिवासी खात्यात असणे हेच आदिवासी समाजाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे तेव्हा डॉ. किरण कुलकर्णी यांना आदिवासी विकास विभाग आयुक्त या पदावरून तात्काळ बरखास्त करण्यात यावी व डॉ. किरण कुलकर्णी व डॉ. कांतीलाल संचेती संकेत इन्स्टिट्यूट संस्थापक पुणे यांच्या दोघांवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात यावेत
त्यावेळी बिरसा क्रांती दल आर्णी तालुका उपाध्यक्ष निलेश उखंडे, तालुका उपाध्यक्ष ऋषीकेश मडपाची, सचिव विजय नैताम, स्वप्नील तिळे, संदीप मडावी, भोजराज दूमारे, सुदर्शन खुडे, संजय तोडसाम, रामेश्र्वर नैताम, गजानन हगवणे, अंकुश टाले आदी नागरीक उपस्थित होते.

Leave a Reply

Back to top button