Kolhapur

जागतिक पर्यावरण समतोल साधण्यासाठी व जैवविविधतेच्या वृदधीसाठी वृक्षारोपण काळाची गरज : यशवंतराव निकम

जागतिक पर्यावरण समतोल साधण्यासाठी व जैवविविधतेच्या वृदधीसाठी वृक्षारोपण काळाची गरज : यशवंतराव निकम

सुभाष भोसले कोल्हापूर

कोल्हापूर : जागतिक पर्यावरण समोतल साधण्यासाठी व जैवविविधतेच्या वृदधीसाठी वृक्षारोपण काळाची गरज आहे असे उदगार यशवंतराव निकम यांनी काढले .ते व्हन्नूर ता . कागल येथे डॉ . बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) व श्री . दौलतराव निकम माध्यमिक विद्यालय व्हन्नूर च्या वतीने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी संतोष पाटील हे होते . श्री निकम पुढे म्हणाले की वृक्षारोपणासारखे उपकम राबवल्यास भविष्यात पर्यावरण समृध्दीत नक्कीच भर पडेल व नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यास निर्सगशक्तीचा वापर करता येईल . बार्टी या
संस्थेच्या वतीने विविध सामाजिक व पर्यावरणपुरक उपक्रम राबवले जातात ही एक प्रेरणादायी बाव आहे . यावेळी बार्टी संस्थेचे कागल तालुका समता दुत किरण चौगुले,मुख्याध्यापक विलास पोवार ,एस . बी . पाटील, भाऊसो माने मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या परीसरात अशोक, फणस, पाम, विविध वृक्षांचे रोपण करण्यात आले . पेरू अशा
या समारंभास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्ग उपस्थित होता . समारंभाचे सुत्रसंचलन व आभार जितेंद्र सावंत यांनी केले .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button