Nashik

माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत नगरपंचायतीच्या वतीने दिंडोरी जनता इंग्लिश स्कुलमध्ये वृक्षारोपण

माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत नगरपंचायतीच्या वतीने दिंडोरी जनता इंग्लिश स्कुलमध्ये वृक्षारोपण

सुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी-

महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने सुरू केलेल्या माझी वसुंधरा या अभियानांतर्गत दिंडोरी नगरपंचायत विविध कार्यक्रम राबवित असून नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती निर्माण होऊन पृथ्वी, अग्नी, जल, वायू व आकाश या पाच तत्वांच्या समतोल व संवर्धनासाठी भाग घ्यावा असे आव्हाहन मुख्याधिकारी नागेश येवले यांनी केले.
दिंडोरी जनता इंग्लिश स्कुल व उच्च माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपण व रोपे वाटप कार्यक्रमाप्रसंगी येवले बोलत होते.
यावेळी मुख्याधिकारी नागेश येवले, प्राचार्य आर सी वडजे, उपप्राचार्य यु डी भरसठ, पर्यवेक्षक श्रीम एन पी बागुल, डॉ जी व्ही आंभोरे, आर व्ही मोकळ, नगरपंचायत चे सुनिल पाटील, प्रदीप मावनकर, प्रशांत पोतदार, हर्षल बोरस्ते, सचिन जाधव, ईश्वर दंडगव्हाळ, राजेंद्र खिरकाडे, राजेंद्र गायकवाड, तानाजी निकम आदी सह विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
नगरपंचायतच्या वतीने देण्यात आलेल्या वृक्ष रोपांचे विद्यालयात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले व विद्यार्थ्यांना रोपे वाटप करण्यात आले.
विद्यालयाचे प्राचार्य आर सी वडजे यांनी प्रास्तविकात सांगितले की, दिंडोरी नगरपंचायत ने सुरू केलेल्या माझी वसुंधरा या अभियानात दिंडोरी जनता इंग्लिश स्कुल चा हरित सेना विभाग व सर्व विध्यार्थी ,सेवक यांचा सहभाग असून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनजागृती करून या अभियानात सहभागी होऊन पर्यावरणाचे रक्षण करण्यात येईल.
यावेळी मुख्याधिकारी नागेश येवले व अधिकारी, कर्मचारी यांचा विध्यालयाच्या वतीने प्राचार्य आर सी वडजे, उपप्राचार्य, पर्यवेक्षक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कथार यांनी तर आभार उपमुख्याध्यापक यु डी भरसठ यांनी मानले.
फोटो- दिंडोरी जनता इंग्लिश स्कुल व उच्च माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपण प्रसंगी मुख्याधिकारी नागेश येवले, प्राचार्य आर सी वडजे, उपप्राचार्य यु डी भरसठ, श्रीम एन पी बागुल आदी

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button