Pune

पुण्यात थरार..! दिवसाढवळ्या महाराष्ट्र बँके वर दरोडा..!लाखो रु आणि कोट्यवधी रु चे दागिने चोरीला..!

पुण्यात थरार..!दिवसाढवळ्या महाराष्ट्र बँके वर दरोडा..!लाखो रु आणि कोट्यवधी रु चे दागिने चोरीला..!

पुणे सर्वत्र गुन्हेगारीच्या घटना प्रचंड वाढताना दिसत आहेत.पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात भर दिवसा चक्क महाराष्ट्र बँकेवर दरोडा पडला आहे. दरोडेखोरांनी बंदूकीचा धाक दाखवत बँकेतील लाखो रुपयांची रोख रक्कम आणि कोट्यवधींचे सोने लंपास केले आहे. संबंधित घटना उघड झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत अचूकपणे कैद झाली आहे.

याबाबतीत सविस्तर माहिती अशी की शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे ही घटना घडली आहे. पिंपरखेड येथे भर दिवसा दुपारी दीड वाजेच्या सुमारास महाराष्ट्र बँकेत दरोडा पडला. दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत बँकेतील 31 लाख रुपये रोकड तसेच 2 कोटी रुपयांचे सोने पळवून नेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. संबंधित प्रकार हा बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. काळ्या रंगाचे कपडे परिधान केलेले जवळपास पाच आरोपी हे बँकेत शिरले. ते चारचाकी वाहनातून आले होते. त्यांनी तोंड बांधलं होतं. ते बँकेत शिरले तेव्हा त्यांनी बँकेतील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत सर्व कॅश पिशवित भरुन द्यायला सांगितली. तसेच त्यांनी बँकेच्या लॉकरमधील सर्व सोनं पिशवीत भरुन चारचाकी गाडीतून पळवून नेलं.

दरोड्याच्या घटनेनंतर तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस वेळेचा विलंब न करता तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बँकेतील सर्व परिस्थितीची पाहणी करत पंचनामा केला. यावेळी त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली. यावेळी सीसीटीव्हीत सर्व प्रकार कैद झाल्याचं उघडकीस आलं आहे. पण चोरांनी तोंड बांधलं होतं. तसेच त्यांनी हातात ग्लोव्ज घातलेले आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button