Dhule

? जळगाव हुन सुरत कडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स चा भीषण अपघात..6 मृत अंदाजे 35 जखमी

? जळगाव हुन सुरत कडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स चा भीषण अपघात..6 मृत अंदाजे 35 जखमी

धुळे – जळगाव हुन सुरत कडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स चा भीषण अपघात झाल्याची घटना रात्री घडली आहे. सुरत महामार्ग क्रमांक सहावर विसरवाडी जवळील कोंडाईबारी घाटात खाजगी ट्रॅव्हल्स जळगावहुन सुरत कडे जात असताना दिनांक 21 रोजगार मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास कोंडाईबारी घाटातील पुलाखाली कोसळल्याने भीषण अपघात झाला. या खाजगी ट्रॅव्हल्स अंदाजे 40 प्रवासी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर अपघातात 6 प्रवासी जागीच ठार झाले असून ३०-३५ प्रवास जखमी झाले आहेत.रात्री दोन ते तीन च्या दरम्यान हा अपघात घडला असतांना प्रवासी झोपेत होते.
विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात येत आहे. जखमींची संख्या जास्त असल्यामुळे विसरवाडी, नवापूर, खांडबारा , नंदुरबार,बपिंपळनेर, दहिवेल येथील 108 रुग्णवाहिका यांचे पाचारण करण्यात आले असून उपचारासाठी तातडीने
विसरवाडी रुग्णालयात हलविण्याचे काम
सुरू आहे..

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी विसरवाजा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक भूषण बैसाणे यांच्यासह पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघात ग्रस्त जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पोहचवण्याचे काम सुरु होते.यात
जखमींची संख्या वाढु शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button