Dhule

आज राष्ट्रीय जंतनाशक दिन, कोडीद येथे राबविण्यात आला.

आज राष्ट्रीय जंतनाशक दिन, कोडीद येथे राबविण्यात आला.

राहुल साळुंके धुळे

धुळे : आज १मार्च २०२१ ‘राष्ट्रीय जंतनाशक दिन’ उपकेंद्र कोडीद ता. शिरपूर येथील प्रत्येक बुथवर, प्रत्येक अंगणवाडीत तसेच ग्रामपंचायत कार्यालय, जि.प.केंद्र शाळा कोडीद, शासकीय आश्रम शाळा कोडीद, डी.न.पाडवी हायस्कूल कोडीद तसेच उपकेंद्र कोडीद अनर्गत येणाऱ्या कोडीद व चाकडू केंद्रातील सर्व अंगणवाडीत व जि.प.शाळेत हा उपक्रम राबविण्यात आला.
ह्यावेळी १वर्षांपासून ते १९वर्ष वयोगटातील मुलामुलींना चावून खावयाच्या जंतनाशक गोळी (Albendazole 400mg) बहुतेक मुलांची शारीरिक वाढ व मानसिक विकास पूर्णता होत नाही वाढ होण्यासाठी ह्या जंतनाशक गोळ्या प्रभावी ठरतात म्हणून या जंतनाशक गोळ्या वर्षातून दोन वेळा घेणं आवश्यक आहे असे आवाहन कोडीद गावाचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.हिरा पावरा ह्यांनी केले ह्यावेळी आरोग्य सेविका, MPW, आरोग्य कर्मचारी, आशा तसेच अंगणवाडी सेविका व शाळेतील शिक्षक ह्यांनी ह्या उपक्रमात सहभाग घेतला.

ह्यावेळी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी आपापल्या दप्तरी सदर उपक्रमाचे उद्घाटन करून सुरुवात करून दिली ह्यावेळी गावाचे युवा पोलीस पाटील श्री.भरत पावरा, श्री.शांतीलाल पावरा, जि.प.शाळेचे मुख्याध्यापक श्री.तापिराम पावरा सर, शासकीय आश्रम शाळेचे मुख्याध्यापक बोरसे सर व संपूर्ण स्टाफ, दि.न.पाडवी हायस्कूल चे संपूर्ण स्टाफ ह्या उपक्रमात सहभाग घेऊन सहकार्य केले.

ह्यावेळी डॉ.हिरा पावरा ह्यांनी ह्या उपक्रमात सहभागी सर्वांचे आभार मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button