Dhule

आज जय आदिवासी युवा शक्ति (जयस), आदिवासी विकास परिषद व रावण राजे फाउंडेशन शिरपुर मार्फत

आज जय आदिवासी युवा शक्ति (जयस), आदिवासी विकास परिषद व रावण राजे फाउंडेशन शिरपुर मार्फत

राहुल साळुंके धुळे

मध्य प्रदेशाची राजधानी भोपाल मध्ये बेरोजगार आंदोलनकारी युवकांवर लाठीचार्ज करून दाखल करण्यात आलेले फौजदारी खटले त्वरित मागे घ्यावेत. व लाठीचार्जची चौकशी करून दोषी पोलीस अधिकाऱ्यांनवर कार्यवाही करा

म्हणून महामहिम राष्ट्रपतिच्या नावाने व पांढरी (अडावद) तालुका चोपड़ा येथील नुना सायसिंग पावरा या बालकाच्या मृतु प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करून चौकशी करा अशी मागणी पोलिस अधीक्षक जळगावच्या नावाने निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहेत की, मध्य प्रदेशाची राजधानी भोपाल येथे राज्यातील अनेक जिल्ह्यांतील युवक येवून नीलम पार्कमध्ये (जे सर्व कार्यक्रम आणि चळवळींसाठी सरकार नियुक्त ठिकाण आहे) अहिंसक पद्धतीने संविधानिक मार्गानी बेरोजगारी विरोधी निदर्शन करत रोजगाराशी संबंधित मागण्या मांडणार होत्या, मात्र त्यांच्यावर पोलिसांनी लाठी-काठीने हिंसक हल्ला केला, ज्यात शेकडो तरुण जखमी झाले आणि शेकडो लोकांना अटकही करण्यात आली, शेकडो अहिंसक आंदोलनकारीना गुन्हेगार घोषित करण्यात आले.
मध्य प्रदेश सरकारला घटनेने दिलेला संघर्षाचा अधिकार हिरावून घ्यायचा आहे काय…? मध्य प्रदेश सरकार तरुणांच्या वाढत्या आत्महत्यांकडे दुर्लक्ष करेल का? रिक्त सरकारी पदांवर सुशिक्षित आणि इतर तरुणांची भरती करून मध्य प्रदेश सरकार बेरोजगारी व बेकारी मिटवू इच्छित नाही का? असा प्रश्न उपस्तित होत आहेत, आज तरुण आणि विद्यार्थ्यांकडे प्रत्येक हक्कासाठी संविधानिक मार्गानी लढण्याशिवाय दुसरा मार्गच नाही. अशा परिस्थितीत, जयस व अन्य संघटनाने बेरोजगारविरोधी चळवळीला पूर्ण पाठिंबा देत आंदोलनकारी युवकांवर दाखल करण्यात आलेले फौजदारी खटले त्वरित मागे घ्यावेत. व लाठीचार्जची चौकशी करून दोषी पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
तसेच दिनांक १४ ऑगस्ट रोजी पांढरी (अडावद) तालुका चोपडा येथील शेतात गडफास घेतलेल्या अवस्थेत १४ वर्षीय बालक नुना पावराचा मृत्यदेह आढळुन आला होता. सदर घटने बाबतीत पोलिस स्टेशन येथे अकस्मात मृत्यु ची नोंद करण्यात आली होती, मात्र सदर घटना ही अकस्मात मृत्यु नसुन बालक गुरांसाठी चारा कापायला दूस-याच्या शेतात गेला असता त्या बालकाची हत्या करून मृतदेहाला गळफास देवून आरोपी कडून परिवाराची व पोलीस प्रशासनाची दिशाभूल करण्यात आली आहेत असा संशय नातेवाईकांनकडून व्यक्त होत आहेत. म्हणून पोलिस प्रशासनानी सदर घटनेबाबत खुनाची नोंदणी करून सदर घटनेची सखोल चौकशी करून दोशिंवर कडक कार्यवाही करण्यात यावे असीही मागणी करण्यात आली त्याचवेळी जय आदिवासी युवा शक्तिचे राज्य प्रवक्ता दिनेश पावरा, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद चे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दारासिंग पावरा, परिषदेचे जिल्हा अध्यक्ष प्रवीण पावरा, युवा उपाध्यक्ष अमर पावरा, रावण राजे फाउंडेशन चे तालुकाध्यक्ष हिम्मत पावरा, संघटक हरिदास पावरा, अनिल पावरा, रविन पावरा, भीमा पावरा, अजय पावरा, सुशील पावरा, राहुल पावरासह कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button