Nashik

बारा बलुतेदारांसाठी रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग सेंटर उभारणार, केंद्रीयमंत्री नितीनजी गडकरी यांचे आश्वासन

बारा बलुतेदारांसाठी रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग सेंटर उभारणार,
केंद्रीयमंत्री नितीनजी गडकरी यांचे आश्वासन

नाशिक शांताराम दुनबळे

नाशिक – :त्र्यंबकेश्वर रोडलगत खादी ग्रामद्योग महामंडळाची २६२ एकर जमीन आहे. या जमिनीवर बारा बलुतेदारांच्या व्यवसायासाठी रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग सेंटर उभारण्यात यावे, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. गोडसे यांच्या मागणीला सकारात्मक संमती दर्शवित खादी ग्रामद्योग महामंडळाच्या जागेवर लवकरच बारा बुलेतेदारांच्या व्यावसायिक प्रगतीसाठी तसेच व्यवसायाच्या आधुनिक शिक्षणासाठी रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग सेंटर उभारणार असल्याचे आश्वासन गडकरी यांनी खा. गोडसे यांना दिले.
नागपूर येथील विविध क्लस्टर उद्योगांची पाहणी करण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून खा. गोडसे नागपूर दौऱ्यावर गेले आहे. या दौऱ्यात त्यांच्यासोबत खासदार सुभाष भामरे, खासदार भारतीताई पवार, भक्तीताई अजिंक्य गोडसे, अजिंक्य गोडसे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झालेले आहेत. नागपूर येथील विविध उद्योगांची पाहणी केल्यानंतर आज खा. हेमंत गोडसे यांनी केंद्रीयमंत्री नामदार नितीन गडकरी यांची भेट घेवून विविध विषयांसदर्भात चर्चा केली. खादी ग्रामद्योग मंडळाची देशातील सर्वात मोठी तब्बल २६२ एकर जमिन नाशिक – त्र्यंबकेश्वर रोडलगत आहे. बारा बलुतेदारांच्या विविध लघू व्यावसायांना चालना मिळण्यासाठी खादी ग्रामउद्योग महामंडळाच्या जागेवर रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग सेंटर उभारावे, अशी मागणी खासदार गोडसे यांनी नामदार नितीन गडकरी यांच्याकडे केली. दरम्यान खा. गोडसे यांची मागणी न्यायिक असल्याचे गडकरी यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ लघु उद्योग विभागाचे संचालक दीप वर्मा यांच्याशी चर्चा केली. या रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग सेंटर उभारणीच्या कामासाठी जवळपास १०० ते १५० कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाचा प्रस्ताव मान्यतेसाठी लवकरात लवकर केंद्राकडे सादर करा अशी सूचना गडकरी यांनी क करदर प्रस्ताव मंजुर करून देण्याचे आश्वासन खासदार गोडसे यांना दिले.
या दौऱ्यादरम्यान खा. गोडसे यांनी विविध क्लस्टर उद्योगांसह नागपूर शहरात नुकताच चर्मकार समाजासाठी उभारण्यात आलेल्या विविध प्रकारच्या फॅन्सी तसेच पारंपारिक चप्पल, बुट उत्पादनाच्या प्रकल्पाची पाहणी केली.इगतपुरी तालुका हा भात पिकांचे माहेरघर असल्याने दरवर्षी जवळपास ३० हजार हेक्टर जमिनीवर भात पिकाची लागवड होत असते. यातून दरवर्षी सुमारे नऊ लाख पोते तांदूळ उत्पादित होत असतो. या ठिकाणी राईस क्लस्टर झाल्यास शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक फायदा होणार असल्याचे गोडसे यांनी स्पष्ट करत राईस क्लस्टर तसेच गारमेंट क्लस्टर उभारण्याची विनंती केली.तसेच खा. डॉ. भारती पवार यांनी नाशिकला कांद्याचे कोठार असल्याने येथे कांदा क्लस्टर उभारण्याची तर खा. डॉ. भामरे यांनी मालेगावसाठी मसाले, बेकरी आणि उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्हयात कॉटन धागा क्लस्टर ( स्पीनिंग )उभारणीची मागणी यावेळी चर्चेदरम्यान गडकरी यांच्याकडे केली

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button