Bhusawal

आपले निरोगी आयुष्य जगण्यासाठी, कोरोना सारख्या महामारी वर मात करण्यासाठी ही.. झाडे लावावीत डी.वाय.एस.पी.श्री सोमनाथ वाकचौरे…

आपले निरोगी आयुष्य जगण्यासाठी, कोरोना सारख्या महामारी वर मात करण्यासाठी ही.. झाडे लावावीत डी.वाय.एस.पी.श्री सोमनाथ वाकचौरे…

भुसावळ : 5 जून या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पोलीस विभाग भुसावळ , निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ व महिला पर्यावरण सखी मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने डी वाय एस पी ऑफीस च्या परिसरात वृक्षारोपण करताना डी वाय एस पी श्री सोमनाथ वाकचौरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आज कोरोना यामहा मारीत खूप मोठे संकटांना आपल्याला तोंड द्यावे लागत आहे ही परिस्थिती का निर्माण झाली याचा पण विचार करायलाच हवा कारण मानवाने मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण केले मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली , भारतीय देशी वृक्षांची तोड मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे पर्यावरणात ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत गेले याचा परिणाम विविध कोणा सारखे आजार संकट आपल्यावर येते यावर जर आपल्याला मात करायची असेल भविष्यासाठी आपल्या मुले, नातू ,पंतु साठी आपली देशी झाडे लावणे आवश्यक आहे यात वड, पिंपळ, औदुंबर, चिंच, कांचन, निंब असे कितीतरी पर्यावरण पूरक झाडे लावणे आवश्यक आहे असे सांगीतले.
यावेळी तालुक्यांचे पी.एस.आय श्री रामकृष्ण कुंभार यांनी कोणती झाडे कोठे लावायची याचे नियोजन करुन त्यांचे झाडे विषयी असलेले प्रेम पाहता अनेक झाडे त्यांनी जगवली आहेत, यावेळी निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळाचे जिल्हाध्यक्ष नाना पाटील यांनीही वृक्ष संदर्भात महिती देवून कमी पाण्यात वृक्ष कसे जगतील यासाठी मडके चा वापर कसा होतो ते सांगून प्रत्यक्ष रोपे सोबत मडकेही बुजुन पाणी भरले
वयोवृध्द राज्य सल्लागार रघुनाथ आप्पा सोनवणे यांचा **माझी वसुंधरा**चे प्रमाणपत्र देवुन गौरव करण्यात आला यावेळी सुरेन्द्रसिंग पाटील, महानंदा ताई पाटील, सौ पाटणकर आदी व सर्व पोलीस कर्मचारी उपस्थीत होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button