Nashik

दिंडोरी मतदारसंघातील विकासाचा बॅकलॉक भरून काढणार – ना.नरहरी झिरवाळ

दिंडोरी मतदारसंघातील विकासाचा बॅकलॉक भरून काढणार – ना.नरहरी झिरवाळ

सुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी

दिंडोरी – तालुक्यात गेल्या दोन वर्षांपासून कोरोना विषाणूच्या प्रभावामुळे निधीअभावी रस्त्याच्या कामाला विलंब होत होता परंतु तालुक्यातील अनेक रस्त्यांची कामे मंजूर झाली असून रस्ते दर्जेदार करून तालुक्याच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यात येईल अशी माहिती विधानसभेचे उपाध्यक्ष ना नरहरी झिरवाळ यांनी मोहाडी, वलखेड येथे विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी काढले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे हे होते दिंडोरी तालुक्यातील वणी,खेडगाव मोहाडी गटातील 44 कोटी रुपयांच्या काही विकास कामांचा शुभारंभ ठिकठिकाणी करण्यात आला लखमापूर फाटा ते लखमापूर, लखमापूर ते खेडले फाटा,पोफशी गावा नजीक नदीवरील पूल लखमापुर फाटा ते वरखेडा रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले . वलखेड फाटा ते पाडे निगडोळ रस्त्याचे कामाचा शुभारंभ, वलखेड येथे सामाजिक सभागृह, आकराळे फाटा येथे अक्राळे फाटा ते लखमापुर फाटा या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले मोहाडी येथे मोहाडी ते कोराटे मोहाडी ते साकोरा मोहाडी ते पालखेड डॅम या रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला. झिरवाळ यांनी आपल्या भाषणात म्हटले की गेल्या दोन वर्षापासून कोरोणा महामारी मुळे विकासाचा निधी आरोग्यावर खरचं करावा लागला त्यामुळे तालुक्यातील अनेक रस्त्यांची कामे थांबली होती त्यामुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागले परंतु चालू आर्थिक वर्षात शासनामार्फत दिंडोरी तालुक्याचा मोठ्या प्रमाणात निधी मिळाल्यामुळे तालुक्यातील सर्वच रस्त्यांची कामे आगामी काळात टप्या टप्याने पूर्ण होतील तालुक्यातील रस्ते दर्जेदार होण्यासाठी अधिकारी वर्गाने लक्ष देऊन व ग्रामस्थांनी सहकार्य करून कामे पूर्ण करून घ्यावीत असे सांगितले. कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी नामदार झिरवाळ यांच्या कार्यकाळात तालुक्यातील रस्त्यांच्या कामाबरोबरच सर्वच सोयीसुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला असून झिरवाळ तालुक्‍यातील जनतेचा विश्वास सार्थ ठरवत आहे. आगामी काळात यापेक्षाही मोठ्या प्रमाणात निधी तालुक्याला मिळणार असून तालुक्यातील रस्ते जलसिंचन शैक्षणिक सुविधा मोठ्या प्रमाणात विस्तारणार असून तालुक्यातील विकासाचा बॅक लोक मोठ्या प्रमाणात भरून निघणार आहे असे यावेळी श्रीराम शेटे यांनी सांगितले कार्यक्रमास कादवा कारखान्याचे संचालक शहाजी सोमवंशी, बाळासाहेब जाधव, जि प सदस्य भास्कर भगरे, विश्वासराव देशमुख, शंकरराव काठे, तुकाराम जोंधळे, पांडुरंग गडकरी, गणेश तिडके, निवृत्ती घुमरे, डॉ योगेश गोसावी श्याम हिरे ,एकनाथ गायकवाड,राजेंद्र उफाडे गोपीनाथ पाटील वलखेड येथे सरपंच विनायक शिंदे,उपसरपंच अनंत पाटील,प्रकाश शिंदे,दिनकर जाधव,रामदास पाटील,बाळासाहेब पाटील,रघुनाथ पाटील,पाडे चे सरपंच नरेंद्र पेलमहाले,मच्छिंद्र पवार, ओझरखेड चे सरपंच गंगाधर नीखाडे, नळवाड पाडा सरपंच हिरामण गावित,तोसिफ मनियार आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होते. कोट – लखमापूर फाटा ते लखमापूर, लखमापूर गाव ते खेडले फाटा, फोफशी गावाजवळ एक लहान पूल बांधणे, लखमापूर फाटा ते वरखेडा रस्ता, वलखेड – निगडोळ – चारोसा रस्त्याची सुधारणा करणे, नाशिक-दिंडोरी रस्ता, मोहाडी ते कोराटे रस्ता, मोहाडी ते पालखेड डॅम रस्ता, मोहाडी ते साकोरे रस्ता, मोहाडी – खडकसुकेणे रस्त्यावर पुलाचे बांधकाम करणे, जऊळके वणी ते चिंचखेड रस्ता, जऊळके वणी ते खेडगाव-शिंदवड रस्ता व शिंदवड ते बोपेगाव रस्ता, सोनजांब फाटा ते सोनजांब गावाकडे सोनजांब फाटा ते कादवा कारखाना, वरखेडा ते खेडगाव रस्ता, कादवा कारखाना ते पुतळ्यासमोरील रस्ता, मातेरवाडी-सोनजांब रस्ता, कादवा कारखाना ते सोनजांब ते मावडी, राष्ट्रीय महामार्ग 953 ते मावडी जोडरस्ता, वणी विश्रामगृहाच्या नवीन इमारत बांधकामाचा शुभारंभ आदींसह विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला .फोटो –

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button