Pune

बैलाप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकऱ्याने घातला बैलाचा तेरावा

बैलाप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकऱ्याने घातला बैलाचा तेरावा

पुणे : केंद्र सरकारने प्राणी हिंसा कायद्यानुसार बैल गाडा शर्यतीवर बंदी घातली खरी, परंतु खेड तालुक्यातील रेटवडी या गावात याच प्राण्यावर किती प्रेम असते याचे एक उदहारण पाहायला मिळाले आहे.

माणसाचा मृत्यू झाला कि त्याचे विधी आपल्या रिती रिवाजाप्रमाणे केले जातात. पण खेड तालुक्यातील रेटवडी गावात काही वेगळा प्रकार पहायला मिळाला. नंदया या बैलाचा मृत्यु झाला. मात्र त्याची आठवण म्हणून त्या शेतकऱ्याने त्याच्या तेराव्याचा विधी करत नंदयाच्या प्रतिमेची पूजा व प्रवचन ठेवून पुर्ण गावाला स्नेह भोजन देण्यात आले. कोरोना महामारीच्या संकट काळात माणसांचे अंत्यविधीही झाले नाहीत तर रक्ताच्या नात्यांनीही मृतदेह घेण्यास टाळाटाळ केली. मात्र कष्टक-याने बैलाची कृतज्ञता व्यक्त करत आयुष्यभराची साथ देणाऱ्या बैलाचा काळे कुटुंबाने शेवट गोड केलाय.

4 महिन्याचे वासरु ते 22 वर्षाचा सहवासात नंद्या बैलाने काळे कुटुंबाच्या सदस्य बनला. आता हा नंद्या काळे कुटुंबाला सोडुन गेलाय. या नंद्याची कृतज्ञता व्यक्त करत बैलाचे अंत्यसंस्कार धार्मिक परंपरेनुसार पार पडला. मुक्या प्राण्यावर माणुस किती प्रेम करतो याचा प्रत्येय रेटवडी गावात आला याचा बोध आपले सरकार घेऊन बैल गाडा शर्यतीवरील बंदी उठवेल का हेच आता पहावे लागेल.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button