मुंबईस्थित सामाजिक संस्थाच्या दातृत्वातून, अमळनेरस्थित श्रीमती भानुबेन शहा गोशाळा व सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांतून शहरी व ग्रामीण भागातील शेकडो गरजू विद्यार्थ्यांना उत्साहात दप्तर, शैक्षणिक साहित्य वाटप भानुबेन गोशाळा येथे करण्यात आले.
अमळनेर : मुंबईस्थित सामाजिक संस्थाच्या दातृत्वातून, अमळनेरस्थित श्रीमती भानुबेन शहा गोशाळा व सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांतून शहरी व ग्रामीण भागातील शेकडो गरजू विद्यार्थ्यांना उत्साहात दप्तर, शैक्षणिक साहित्य वाटप भानुबेन गोशाळा येथे करण्यात आले.
शाळा सुरू होत असतांना शैक्षणिक साहित्यावाचून गरीब गरजू विद्यार्थी वंचित राहू नये या उद्देशाने अमळनेर शहर व तालुक्यातील शेकडो विद्यार्थ्यांना दप्तर, शैक्षणिक साहित्यमान्यवरांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले. मुंबई येथिल सामाजिक कार्यकर्ते कमलेश भाई सावला,
जुलेशभाई शहा, नाविनभाई गाला यांनी शैक्षणिक गुणवत्तेच्या प्रवाहात शैक्षणिक साहित्याच्या मदतीने विद्यार्थी
टिकून रहाण्याचा उद्देश असल्याचे यावेळी सांगितले. प्रास्ताविकात प्रकल्प संयोजक प्रा अशोक पवार यांनी ,वंचित विद्यार्थ्यांना दातृत्वाचा हात माध्यम म्हणून पोहचवण्याचे काम गोशाळा आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या परिश्रमाने होत असल्याचे सांगितले. सुत्रसंचालन भारतीताई गाला यांनी केले. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मान्यवरांच्या हस्ते दिवसभर टप्याटप्याने शाळानिहाय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.तर विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन हि देण्यात आले.प्रमुख पाहुणे मा.नगराध्यक्ष विनोद पाटील,जनकल्याण ग्रुप,दादर चे कमलेशभाई सावला,हर्षा बेन सावला ,हेतल बेन गाला, सेवा सौभाग्य ट्रस्ट नविनभाई गाला, रमेशभाइ डेडीया, हिरणभाई विसरिया, राजेश भाई हरिया, श्री अरिहंत कृपा फाऊंडेशन जुलेशभाई शहा,अपूर्व भाई बंसाली,आदिसह माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, पत्रकार किरण पाटील, गोशाळेचे दिलीप डेरे, राजुभाई सेठ, मान्यवर उपस्थित होते. आभार गौतम मोरे यांनी मानले.तर मुंबई स्थित ग्रुप टी एस एस ग्रुप अनुष्का पंजाबी,ब्लेस ग्रुप चे अनुदिदी,प्राणा वर्ल्ड ग्रुप आदींचेही सहकार्य सदर दातृत्वासाठी लाभले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मगन पाटील, बन्सीलाल भागवत,संदीप घोरपडे, वत्सल शहा,हमीद मास्टर,मिहीर शहा,पंकज शहा,संदिप जैन,विक्रम पाटिल,डी के पाटील,छाया इसे, योगेश पाटिल,डॉ निलेश मोरे, छाया इसे,जयप्रकाश लांडगे,छाया सोनवणे,अशोक इसे, शिवाजीराव सोनवणे,संजय जगताप, बन्सीलाल शिरसाठ सिटू डोडीवाला,शैलेशभाई शहा, संजयजी शर्मा,सरस्वती विद्या मंदिर चे मुख्याध्यापक रणजित शिंदे,समता युवक कल्याण केंद्र शाळेचे आशिष पवार,शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले. तर चेतन सोनार, महेंद्र पाटिल, सतिष वाणी, आदिंसह श्रीमती भानुबेन शहा गोशाळेचे संचालक मंडळाचे सहकार्य लाभले.