Nashik

पिंपळगाव बसवंत येथे रानमळा लोणवाडी येथे दरोड्याच्या तयारीत असलेले तीन चोरटे जेरबंद .

पिंपळगाव बसवंत येथे रानमळा लोणवाडी येथे दरोड्याच्या तयारीत असलेले तीन चोरटे जेरबंद .

शांताराम दुनबळे नाशिक

नाशिक : निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे जवळच असलेल्या रानमळा लोणवाडी शिवारात धारदार शस्त्रा सह दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा तुरट यापैकी तीन सराईत चोरांना पकडण्यात पिंपळगाव बसवंत पोलिसांना यश आले आहे तिन्ही आरोपी कडून एक मोबाईल चाॅपर गज मिरची पूड वेळूच्या काठ्या नायलॉन दोरी कोयता आधी सह अकरा हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपळगाव शहरात दिनांक 23 रोजी मध्यरात्री पोलिस कॉन्स्टेबल नितीन जाधव संदीप दराडे मिथुन घोडके आदी मोटरसायकलवर गस्त घालत होते पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक पावसे यांना मध्यरात्रीच्या सुमारास रानमळा लोणवाडी शिवारात दरोड्याच्या तयारीत काही चोरटे धारदार शस्त्र घेऊन वावरत असल्याची गुप्त माहिती मिळाली त्यानुसार मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास गस्त घालणाऱ्या पोलिसासह घटनास्थळी उपनिरीक्षक पुंडलिक पावसे पोलीस कॉन्स्टेबल तुषार झालटे शांताराम निंबकर राकेश धोंडगे यांनी धाव घेतली पोलिसांना बघून काही आरोपींनी पळ काढला त्याच वेळी पाटलाकडून आरोपी मोहित भास्कर गांगुर्डे मुकुंद गणपत देशमुख रोहित केशव गायकवाड आदींना पकडण्यात यश आले तर पलायन केलेला आरोपी मुंजा उर्फ दानिश सरफराज शेख बापू उर्फ प्रतिक पांडुरंग मातेरे भूषण उर्फ स्वप्नील सुनील गोसावी आदिवर पिंपळगाव पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल नितीन जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला चोरट्यांकडून अकरा हजाराचा मोबाईल लोखंडी धारदार चॉपर तीन फूट लांबीचा गरज मिरची पूड पाकीट लोखंडी पाट्या कोयता नायलॉन दोरी आधी अकरा हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करीत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button