Dharangaw

बाभूळगाव येथे विजेचे तार कोसळून तीन गुरे जागीच ठार

बाभूळगाव येथे विजेचे तार कोसळून तीन गुरे जागीच ठार

कमलेश पाटील धरणगाव

धरणगाव : धरणगाव तालुक्यातील बाभूळगाव परिसरात आज सकाळी झालेल्या दमदार पावसाने हजेरी लावली यामुळे ‘महावितरण’ची दाणादाण उडाली. गावातील वीज वाहक तार तुटल्याने ३ म्हशी जागीच ठार झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे .

जळगाव जिल्ह्यात 16,17 रोजी हवामान खात्याने पाऊस पडणार असल्याचे संकेत दिले होते त्यानुसार रात्री पासून पावसाने हजेरी लावली होती आज सकाळी झालेल्या दमदार पावसाने ‘महावितरण’ची दाणादाण उडाली. गावातील व परिसरातील वीजपुरवठा सुरू होता .बाभुळगाव परिसरात सकाळी अवकाळी पावसामुळे सकाळी 11 वाजेला शेतकरी सर्व गुरे घेऊन चरण्यासाठी घेऊन जात असताना अचानक विजेचे तार तुटल्याने बाभुळगाव येथील लक्ष्मण तुकाराम कोळी या शेतऱ्यांच्या तीन गुरे जागीच ठार झाले आहे .

यात शेतकऱ्याचे जवळ पास 2 लाखांपर्यंत नुकसान झाले आहे. घटना स्थळी तलाठी आरिफ शेख पचनामा केला आहे. नागरिकांनी पोलीस स्टेशन, महावितरण यांना देखील या घटनेची माहिती दिल्याचे सांगण्यात येत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button