Nashik

चांदवड शहरात गोमांस विक्री करताना तिघांना अटक मुद्देमाल जप्त.

चांदवड शहरात गोमांस विक्री करताना तिघांना अटक मुद्देमाल जप्त.
नाशिक शांताराम दुनबळे.

नाशिक=चांदवड शहरातील नानावली मज्जिद परिसरात शुक्रवार दिनांक 29/10 /21 रोजी नानावली मज्जिद परिसरात गोमांस विक्री करताना चांदवड शहर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

खलील फकीरा मोहम्मद कुरेशी वय 42 रा. माऊली नगर नांदगाव ,नदीम फारूक कुरेशी वय 30 रा.चांदणी चौक, ओझर ता.निफाड, नईम फारूक कुरेशी वय 30 रा. चांदणी चौक ओझर हे आपल्या एम एच 15 सीएम 0 610 या झेन गाडीतून ४८किलो गोमांस नानावली मज्जिद परिसरात व मोटरसायकल क्रमांक एम एच 41ए एफ 9559 (एचएफ डीलक्स) वरून १७ किलो ४५० ग्रॅम गोमांस घेऊन जाताना पोलिसांनी श्रीराम रोड चांदवड येथे पकडण्यात आला.
त्यामुळे प्राणी संरक्षण कायदा 2015 चे सुधारित कलम 5(क), 9(अ), 9(ब) भा द वि कलम 188 उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्यात मोटार सायकल, झेन कार, सह 55 किलो गोमास यासह 3,45,472 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
चांदवड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ.चंद्रकांत पवार, पो.ना.अरुण डोंगरे, पो.ना.बी एन वालेकर, पो.ना.आर बी बिन्नर, व पो.ना. सुशांत मरकड हे तपास करीत आहेत

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button