Dhule

कोडीद येथील यावर्षीचे महाशिवरात्री यात्रोत्सव कोराना महामारीच्या प्रादुर्भावामुळे रद्द.!

कोडीद येथील यावर्षीचे महाशिवरात्री यात्रोत्सव कोराना महामारीच्या प्रादुर्भावामुळे रद्द.!

राहुल साळुंके धुळे

धुळे : शिरपूर तालुक्यातील आदिवासीबहुल भागातील कोडीद येथील प्रसिध्द यात्रोत्सव म्हणून गेल्या अनेक दशकांपासून सुरु असलेली महाशिवरात्री यात्रोत्सव नावारूपाला आहे.
ह्या यात्रोत्सवात महाशिवरात्री निमित्त भगवान शिवची महापूजा, महाआरती होत असते. या यात्रोत्सवात उत्तर महाराष्ट्र, मध्य प्रदेश तसेच अनेक ठिकाणाहून व्यापारी येत असतात. दोन दिवस चालत असलेल्या ह्या यात्रेत लाखोंची उलाढाल होत असते.
येत्या ११मार्च रोजी सालाबादाप्रमाणे महाशिवरात्री होत असते पण यावर्षी कोरोना माहामारीच्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाच्या निदर्शनामुळे रद्द करण्यात येत आहे.
ह्यादिवशी होत असलेली भगवान शिवची महाआरती, पूजा, रथोत्सव मात्र कोविड-१९ चे नियम पालन करून होणार आहे.
ही सूचना व नियम सर्व व्यापारी, परिसरातील व गावातील यात्रेकरूंना लागू होईल अशी सूचना समस्त बैठकीत ठरविण्यात आली.
ही सूचना गावातील समस्त गावकऱ्यांच्या बैठकीत ठरविण्यात आले ह्यावेळी पोलीस पाटील, पंचमंडळी, प्रतिष्ठित व्यक्ती व गावकरी एकत्र येऊन ठरवून घेतली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button