Mumbai

सिद्धार्थ चे हे मृत्यू बद्दल ट्विट होत आहे व्हायरल..!पहा काय म्हणाला होता..!

सिद्धार्थ चे हे मृत्यू बद्दल ट्विट होत आहे व्हायरल..!पहा काय म्हणाला होता..!

मुंबई बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर त्याच्या अनेक आठवणी विविध स्तरांतून शेअर करण्यात येत आहेत. यामध्ये सर्वाधिक शेअर केली जाणारी आणि विचार करायला भाग पाडणारी पोस्ट आहे सिद्धार्थचं एक ट्विट. सिद्धार्थचं हे ट्विट सर्वाधिक शेअर होण्याचं कारण म्हणजे यामध्ये त्यानं त्यात मृत्यूबाबत मांडलेले विचार. त्यानं 24 ऑक्टोबर 2017 रोजी दुपारी 2.33 वाजता केलेल्या एका ट्विटमध्ये लिहिलं होत मृत्यू हे आयुष्यातील सर्वात मोठं नुकसान नाही. तर, आपण जगताना आपल्यामधील कोणते गुण मरण पावतात, यात मोठं नुकसान आहे. सिद्धार्थनं हे ट्विट केलं तेव्हा त्याच्या मनात नेमकी कोणत्या भावना होत्या याबद्दल प्रश्न उपस्थित केला जात आहे. सिद्धार्थचं हे ट्विट व्हायरल होताच त्यावर पुन्हा एकदा चाहत्यांनी व्यक्त होण्यास सुरुवात केली आहे. सिद्धार्थचे हे विचार काही वर्षांपूर्वीचे असले, तरीही त्यात मोठा गंभीर अर्थ दडलेला आहे हेच स्पष्ट होत आहे. संपुर्ण सोशल मीडियावर सिद्धार्थ ला श्रद्धांजली वाहिली जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button