Chimur

आमच्या कुटुंबाची जबाबदारी को़णाची ? – ओ बी सी संघटनेचे कवडू लोहकरे यांचा संतप्त सवाल

आमच्या कुटुंबाची जबाबदारी को़णाची ? – ओ बी सी संघटनेचे कवडू लोहकरे यांचा संतप्त सवाल

एक शिक्षक पाच जबाबदा-या

चिमूर प्रतिनिधी–ज्ञानेश्वर जुमनाके

चिमुर–:: सध्या कोरोना महामारीने संपुर्ण भारत होरपळून निघत आहे. कोरोना दिवसेंदिवस वाढत असल्याने मृत्यू चे प्रमाण वाढतच आहे. यावर प्रतिबंध घालण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे यांनी “”माझे कुटुंब माझी जबाबदारी”” ही महत्त्वकांक्षी चळवळ सुरू केली आहे. या चळवळी अंतर्गत प्रत्येक कुटुंबाच्या घरी जाऊन आँक्सीजन पातळी व तापमान तपासल्या जाणार आहे. या मोहीमेसाठी आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांनी काम करन्याचा स्पष्ट नकार दिल्याने या मोहीमेची धुरा “गुरुजींच्या” खांद्यावर जाणीवपूर्वक लादली आहे. त्यामुळे गुरुजींच्या मनात असंतोष पेटला आहे.

कोरोना महामारीत कोरोना पाँझीटीव्ह आलेल्या कुटुंबीयांच्या समोर कन्टेंमेट झोन लावुन त्या ठिकाणी” गुरुजींनाच “दावनीला बांधण्यात आले. ती सुद्धा जबाबदारी यशस्वी पार पाडली. त्यातच प्रशासनाच्या आदेशाप्रमाणे घरोघरी सर्दी, खोकला, ताप यांची माहीत मिळविण्यासाठी कोरोना सर्वेक्षण गुरुजींच्या मस्तकी मारण्यात आले. ती सुध्दा जबाबदारी पार पाडली. त्यातच पुन्हा मतदार यादी सर्वेक्षण मध्ये मतदार यादी प्रसिद्ध करण्यासाठी बि. एल. ओ. चा अतिरिक्त भार “गुरुजींना” देउन आदेश व पत्र काढण्यात आले. आदेश घरी येत नाही तर “माझे कुटुंब माझी जबाबदारी “चा चौथ्या भार गुरुजींच्या मानगुटीवर ठेवला.

त्यातच विद्यार्थ्यांना गृह भेटी देऊन मार्गदर्शन करने, आँनलाईन अध्ययन, अध्यापन करने या सर्व बाबी लक्षात घेऊन एक शिक्षक पाच जबाबदा-या कसे घेऊन चालणार.? मुख्ध्यापक मार्फत कोणत्याही प्रकारचा आदेश पत्र नाही. सरळ व्हाँटसअप मार्फत शिक्षकांच्या मानेवर तलवार चालविने चालु आहे. अशी सटकुन टिका ओ बी सी संघटनेचे कवडू लोहकरे यांनी केली आहे.
माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत कोणत्याही प्रकारचे विमा कवच नाही, सुरक्षा साहीत्य व साधने नाही,गंभीर आजारग्रस्तांना(बी.पी.,शुगर, अटँक,)यांना वगळले नाही. त्यामुळे कोरोना महामारीत “गुरुजींना” झोकण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेक शिक्षक संघटनांनी विरोध दर्शविला आहे.त्यामुळे बहिष्काराचे हत्यार उभारण्याच्या मार्गावर आहे. प्रशासन कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे.

कवडू लोहकरे यांचे मत

“”माझे कुटुंब माझी जबाबदारी नसुन दुसऱ्या चे कुटुंब माझी जबाबदारी असं झालं आहे. आमच्या कुटुंबाची जबाबदारी कोण घेणार? “”शिक्षकातील प्रचंड ताण तणावाचे वातावरण दिसुन येत आहे.

कवडू लोहकरे
कोषाध्यक्ष — राष्ट्रीय ओ बी सी कर्मचारी अधिकारी महासंघ चिमुर

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button