Parola

लपवा छपवी या पध्द्तीने पारोळ्यात चालत आहे व्यापार.

लपवा छपवी या पध्द्तीने पारोळ्यात चालत आहे व्यापार.

कमलेश चौधरी पारोळा

पारोळा : कोरोना विषाणू हा दिवसेंदिवस आपले पाय पसरवीत आहे. तर प्रशासनही त्याला आटोक्यात आणण्यासाठी जिवाच्या आकांताने प्रयत्न करीत आहे. पण त्या प्रयत्नांना साथ पाहिजे तर ती म्हणजे सामान्य जनतेची व व्यापाऱ्यांची. राज्यसरच्या नियमावलींची पायमल्ली होतांना पारोळा शहरात दिसुन येत आहे. जनता किराणा, मेडिकल व डॉक्टरच्या नावाखाली बाजारात फिरत असतात तसेच प्रशासकीय अधिकारींनी विचारल्यावर वायफळ करणे देऊन काढता पाय घेतात.

तद्नंतर व्यापारी मंडळी संचारबंदीतही व्यापार करण्यासाठी दुकानाचा मागील दरवाजाने व्यवसाय करतात. ग्राहकाला दुकानात घेऊन मदतनीसच्या सहाय्याने बाहेरील शटर बंद करून आत छुप्या पध्द्तीने व्यापार करीत असतात.

7 ते 11 या वेळेत फक्त अत्यावश्यक सेवांना (दुकान) परवानगी असून त्यावेळेत अनावश्यक दुकाने सुरू असतात व त्यांचा छुपा व्यापार दिवसभर असाच बाजारात व शहरात सुरूच असतो. देशी दारूची गावातील दुकानेही बिनधास्तपणे उघडे आहेत. याठिकाणी मुख्याधिकारी व राज्य सरकार यांच्या नियमाची पायमल्ली होतांना दिसून येते.
तरी अश्या व्यापार्यांवर व व्यापाऱ्यांसोबत व्यापार करणाऱ्या ग्राहकांवर दंडात्मक कार्यवाही व्हावे असे सामान्य व सुजाण नागरिकांकडून सांगितले जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button