World

ह्या नराधमाने केले 100 मृतदेहांवर बलात्कार..!अखेर अटकेत..!

ह्या नराधमाने केले 100 मृतदेहांवर बलात्कार..!अखेर अटकेत..!

ब्रिटन जगात अनेक गोष्टी सन सनाटी घडत असतात.अनेक विक्षिप्त लोक विचित्र आणि विचित्र गुन्हे करत असतात.ह्या व्यक्तीने एक-दोन नव्हे तर 100 बलात्कार केले असून आश्‍चर्य म्हणजे या आरोपीने मृतदेहांवर बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. ह्या प्रकरणात ब्रिटनमधील डेव्हिड फुलर ह्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
फुलरने शवगृहात महिला आणि मुलांसह किमान 100 मृतदेहांवर लैंगिक संबंध ठेवल्याचे मान्य केले असून आश्चर्याची गोष्ट म्हणजे 100 मृतदेहांवर बलात्कार केल्याची घटना कोणाच्याही लक्षात आली नाही. खुनाचा आरोप असलेल्या फुलर ज्या वेळी पोलिसांनी अटक केली त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबतीत सविस्तर वृत्त असे की 1987 मध्ये वेंडी नेल आणि कॅरोलिन पियर्स या दोन महिलांच्या न सुटलेल्या खुनाच्या प्रकरणात डीएनए जुळल्यानंतर पोलिसांनी फुलरला अटक केली. फुलरला पोलिसांनी तीन दशक जुन्या खून प्रकरणात पकडले होते.
मात्र चौकशी दरम्यान आरोपीचे वास्तव जाणून पोलीस देखील चक्रावून गेले. फुलरच्या घराच्या झडतीदरम्यान, पोलिसांना हजारो लैंगिक शोषणाची छायाचित्रे, हार्ड ड्राइव्ह, फ्लॉपी डिस्क, डीव्हीडी आणि मेमरी कार्ड सापडले ज्यामध्ये अश्लील साहित्य होते.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, पोलिसांच्या पथकाला शवगृहातील मृतदेहांशी त्याने संबंध ठेवल्याचे उघड झाले आहेत. त्याने काही फोटो फोल्डरमध्ये सेव्ह केले होते ज्यात पीडितांची नावे होती. एका व्हिडिओमध्ये तो तीन मुलांसह एका महिलेच्या मृतदेहाची छेड काढताना दिसत होता.
फुलरने 2008 ते नोव्हेंबर 2020 दरम्यान 99 मृतदेहांवर बलात्कार केला. त्या काळात फुलरने केंट, ससेक्स आणि टुनब्रिज वेल्स हॉस्पिटलमध्ये काम केले. परंतु तपास अधिकारी केवळ 78 मृतदेहांची ओळख पटवू शकले ज्यासोबत फुलरने गैरवर्तन केले होते.
आरोपीला एक विचित्र सवय होती. मृतदेहाशी संबंध ठेवल्यानंतर तो घटना डायरीत लिहून ठेवत असे. त्याने केलेल्या सर्व अत्याचारांची नोंद त्या डायरीमध्ये ठेवली आहे. फुलर हा हॉस्पिटलमध्ये रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करत होता. इतर कर्मचारी निघून गेल्यावर तो गुपचूप शवागारात जायचा आणि हे कृत्य करायचा. फुलरवर दोन मुली, नेल आणि पियर्स यांच्या हत्येसह 51 गुन्ह्यांसाठी दोषी ठरवण्यात आले आहे, तसेच मृतदेहाच्या विनयभंगाच्या 44 गुन्ह्यांचा समावेश आहे.पुढील तपास सुरू आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button