Mumbai

अरे हा तर हिवसाळा..!राज्यात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता..!ह्या जिल्ह्यांना येलो अलर्ट..!

अरे हा तर हिवसाळा..!राज्यात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता..!ह्या जिल्ह्यांना येलो अलर्ट..!

मुंबई हिवाळा जरी सुरू झाला असला तरी पावसाळा मात्र अजूनही थांबलेला नाही त्यामुळे आता नवीन ऋतू ला हिवसाळा म्हणावे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. पुन्हा राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे येत्या काही दिवसात महाराष्ट्रात अव अवेळी पडणाऱ्या या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. याचा जबरदस्त फटका रब्बी पिकांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

हवामान खात्याने पुण्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने पुण्यासह, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे, औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे.

अलीकडेच कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. गहू, हरभरा, ऊस या प्रमुख पिकांना मोठा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे गव्हाच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.त्यामुळे शेतकरी संकटात आहे. यानंतर आता पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात ढगाळ हवामानाची नोंद झाली आहे. त्यामुळे पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव होण्याची भीतीही शेतकऱ्यांना आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button