Amalner
Trending

हे प्रवेशद्वार नसून साक्षात मृत्यू द्वार..अजून किती जणांचे रक्त पिऊन पूर्ण होईल हे प्रवेशद्वार..!

हे प्रवेशद्वार नसून साक्षात मृत्यू द्वार..अजून किती जणांचे रक्त पिऊन पूर्ण होईल हे प्रवेशद्वार..!

अमळनेर येथील धुळे रोडवर नवीन प्रवेशद्वाराचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे.सदर प्रवेशद्वाराने आता पर्यंत 3 जणांचे बळी घेतले असून जवळजवळ 25 वेळा अपघात तर 50 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत.यातील काही अजूनही उपचार घेत आहेत.गेल्या अनेक महिन्यांपासून ह्या प्रवेशद्वाराजवळ अपघातांचे सत्र सुरू आहे.

येथे झालेल्या प्रत्येक अपघाता नंतर वृत्तपत्र आणि डिजिटल मिडीयाने वृत्त प्रसिद्ध केले आहेत. पण तरीही निगरगठ्ठ प्रशासन ठिम्म आहे.कदाचित अजून काही मृत्यू पाहिल्यावरच ह्या प्रवेशद्वाराचे समाधान होणार आहे.अपघात होण्याचे कारण म्हणजे ह्या प्रवेशद्वाराच्या मधला स्तंभ किंवा पिलर दिसत नाही त्यामुळे अपघात होत आहेत.असे निदर्शनास आल्या नंतर कामासाठी प्रवेश बंद करून दुसऱ्या बाजूने रस्ता काढला आहे रात्रीच्या वेळी वाहनधारकांना हा वळण रस्ता दिसत नाही परिणामी अपघात होत आहेत. वळण दिसावे यासाठी दिशा दर्शक फलक,निर्देश सूचना वजाव्यवस्था ठेकेदाराकडून करण्यात आलेली नाही.त्यामुळे रात्री वाहने थेट या गेटच्या पिलरला येऊन धडतात.या अपघात मालिकेमुळे तालुक्यात उलट सुलट चर्चेला उत आला आहे.

 

 

धुळे रोडवर अमळनेर शहराच्या सीमेवर भव्य प्रवेशद्वाराचे बांधकाम माजी आ.शिरीष चौधरी यांनी केलेल्या पाठपुराव्याने सुरू झाले आहे.आतापर्यंत बरेच काम पूर्ण झाले असून ह्या प्रवेशद्वाराचे काम शेवटच्या टप्प्यात आहे.आणि हेच काम अत्यन्त संथ गतीने सुरू आहे.
या प्रवेशद्वाराच्या बांधकामा दरम्यान रिफ्लेकटर लावणे आवश्यक आहे. बॅरिगेट्स लावणे आवश्यक आहे.

धुळे रोडवरून सतत वाहने ये जा करत असतात.आणि वाहतुक मोठ्या प्रमाणात होत असते या अनुषंगाने ह्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. गेल्या महिन्या भरात 5 ते 6 अपघात झाले असून सार्वजनिक बांधकाम विभागाने डोळ्यावर पट्टी बांधली आहे. एव्हढा जुना विभाग यांना नियमांचे पालन करा.लोकांच्या जीवाशी खेळू नका हे सांगावे लागते.म्हणजे एव्हढे उच्च शिक्षित अधिकारी, कर्मचारी हे सांग कामे हर कामे आहेत का? जर कुणाचं काही बर वाईट झालं तर याला जबाबदार कोण राहील असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

लवकरात लवकर हे प्रवेशद्वार एकतर पूर्ण करावे आणि इथे आवश्यक त्या सर्व नियमानुसार फलक,इंडिकेटर, रिफ्लेकटर लावावेत अशी मागणी केली जात आहे.परवा झालेल्या अपघातानंतर ठेकेदारावर जीवितहानीचा गुन्हा दाखल व्हावा अशी देखील मागणी केली जात आहे.

संबंधित लेख

Back to top button