Solapur

हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय आहे

हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय आहे
रफिक आतार सोलापूर
सोलापूर : सोलापूरकरांच्या हक्काच्या उजनी जलाशयातील ५ टीएमसी पाणी फक्त ‘सांडपाणी’ हा गोंडस शब्द वापरून बारामतीकरांनी पळविण्याचा चंग बांधलेला होता. माध्यमांमध्ये आलेल्या बातमीमुळे जिल्ह्यातील चळवळीतील शेतकरी जागा झाला, आणि त्यामुळे उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीची स्थापना झाली. हा आदेश रद्द करण्यासाठी आम्ही लढलो.आज जयंत पाटील यांचं वक्तव्य पाहिलं आणि त्यांनी आदेश रद्द केल्याचे कळाले आहे. हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय आहे.
अतुल खूपसे पाटील
अध्यक्ष, उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समिती
ही चळवळ अशीच सुरु राहणार- दि. 22 एप्रिल रोजी उजनी जलाशयातील ५ टीएमसी पाणी वळविण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री महोदय यांनी सही केली. या निर्णयाला विरोध म्हणून आम्ही उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून चळवळ उभा केली. शेतकरी नेत्यांच्या सहकार्यातून संघर्ष सुरू केला. दरम्यान मंत्री जयंत पाटील यांनी हा आदेश रद्द केल्याचे सांगितले. मात्र या रद्द केलेल्या आदेशावर जोपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वाक्षरी होत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा ही चळवळ अखंडपणे चालू ठेवणार आहोत. कारण पाठीत खंजीर खुपसण्याची यांची पिढीजात सवय आहे.
माऊली हळणवर सचिव, उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समिती

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button